ठरलं! सुनेत्रा पवारांच्या विरोधात हा बलाढ्य नेता उभा राहणार; उद्याचा अर्ज भरणार|VIDEO

Sunetra Pawar Vs Laxman Hake Baramati Contest: बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या विरोधात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उमेदवारी जाहीर केली असून ते उद्या अर्ज भरणार आहेत.

अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर बारामतीची रिक्त झालेली जागा कोण लढवणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी यावर त्यांचा जाहीर केला आहे. हाके म्हणाले, मी एक ओबीसी आंदोलक आहे. कुठल्याही पक्षाचा सदस्य नाही. पण ओबीसी समाजाच्या बांधवांचे प्रश्न पटलावर येण्यासाठी मी बारामतीची पोटनिवडणूक लढवत असल्याची भूमिका लक्ष्मण हाके यांनी आज जाहीर केली. ही निवडणूक संवेदनशील असली तरी सुद्धा सरकार ने ओबीसी समाजाकडे लक्ष दिलं नाही. त्यामुळे आम्ही निवडणूक लढवणार असल्याची प्रतिक्रिया हाके यांनी दिली. तसेच लक्ष्मण हाके हे उद्या अर्ज भरणार आहे. राज्यातील इतर पक्ष हे सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार असल्याचे सांगितले जात असताना आता हाके विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com