युद्धामुळे मिरचीचे कंटेनर बंदरात अडकले; व्यापाऱ्यांना कोट्यवधींचा फटका|VIDEO

Gulf War Impact On Nandurbar Chilli Export Market: आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यातील मिरची निर्यात मोठ्या संकटात सापडली आहे. बंदरांवर कंटेनर अडकून पडल्याने व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असून मिरची बाजारातील व्यवहारही मंदावले आहेत.

नंदुरबार जिल्हा हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा मिरची उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथील मिरची मोठ्या प्रमाणावर मुंबईमार्गे समुद्र मार्गाने बांगलादेश तसेच आखाती देशांमध्ये निर्यात केली जाते. सध्या निर्माण झालेल्या युद्धाच्या परिस्थितीमुळे अनेक कंटेनर बंदरांवरच अडकून पडले आहेत. त्यामुळे मिरचीची निर्यात थांबली असून व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. साठवणूक वाढल्याने बाजारातील व्यवहारही मंदावले आहेत. युद्धाची परिस्थिती सुरळीत झाल्यानंतरच मिरचीची निर्यात पुन्हा सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पुढील काही दिवस मिरची व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com