Bharli Mirchi Recipe: अस्सल गावरान स्टाईल भरली मिरची कशी बनवायची?

Manasvi Choudhary

भरली मिरची

रोजच्या जेवणाला तोंडी लावण्यासाठी भरलेली मिरची अनेकजण खातात. अस्सल गावरान स्टाईल भरलू मिरची घरी बनवण्याची रेसिपी सोपी आहे.

Bharli Mirchi Recipe

साहित्य

भरलेली मिरची बनवण्यासाठी मिरची, शेंगदाणे कूट, लसूण पाकळ्या, कोथिंबीर हळद, मसाला, धनापावडर, गरम मसाला, मीठ आणि तेल हे साहित्य एकत्र करा.

Bharli Mirchi Recipe

मिरची स्वच्छ करा

मिरच्या स्वच्छ धुवून कोरड्या करून घ्या. त्यानंतर सुरीने मिरचीला मधून उभी चीर द्या. जर तुम्हाला जास्त तिखट नको असेल, तर मिरचीतील बिया काढून टाका.

Bharli Mirchi Recipe | GOOGLE

सारण तयार करा

एका मोठ्या वाटीत शेंगदाण्याचा कूट घ्या. त्यात ठेचलेला लसूण, कोथिंबीर, हळद, धने-जीरे पूड, गरम मसाला, मीठ मिक्स करा

Bharli Mirchi Recipe

मिरचीत सारण भरा

तयार केलेले सारण प्रत्येक मिरचीमध्ये दाबून व्यवस्थित भरा. मसाला बाहेर येणार नाही याची काळजी घ्या.

Bharli Mirchi Recipe | yandex

मिरच्या फ्राय करा

गॅसवर कढईत तेल गरम झाले की त्यात चिमूटभर मोहरी आणि हिंग टाका. आता भरलेल्या मिरच्या तेलात सोडा. गॅसची आच मंद ठेवा.

Bharli Mirchi | yandex

मिरची परतून घ्या

मिरच्यांवर झाकण ठेवा आणि २-३ मिनिटे वाफ काढा. त्यानंतर झाकण काढून मिरच्या दोन्ही बाजूने परतून घ्या

Bharli Mirchi | yandex

next: Summer Health Tips: उन्हाळ्यात शरीर आतून थंड ठेवण्यासाठी काय खावे?

येथे क्लिक करा...