Manasvi Choudhary
उन्हाळ्यात वाढलेल्या उष्णता, घाम आणि थकवा यामुळे शरीर डिहायड्रेट होते. आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात.
उन्हाळ्यात बाहेरचे तापमान वाढल्यामुळे शरीरातील उष्णता वाढते, ज्याचा परिणाम पचन आणि त्वचेवर होतो.
उन्हाळ्यात दुपारी जेवणात दही किंवा मसाला ताक पिणे यामुळे उष्णतेमुळे होणारी अॅसिडिटी कमी होते.
कलिंगडामध्ये ९०% पेक्षा जास्त पाणी असते, जे उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी सर्वोत्तम आहे.
काकडीमध्ये फायबर आणि पाण्याचे प्रमाण भरपूर असते, जे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते. काकडी खाल्याने पोटाला थंडावा मिळतो आणि त्वचा टवटवीत राहते.
उन्हाळ्यात पाण्यात सब्जा भिजवून त्यात फालुदा, लिंबू पाणी मिक्स करून प्या यामुळे पोटातील जळजळ कमी होते
रोज एक ग्लास लिंबू सरबत प्या, यामुळे 'व्हिटॅमिन सी' मिळते आणि शरीरातील ऊर्जेची पातळी टिकते.