पश्चिमी आशियामध्ये सुरू असलेल्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. आता त्याचा थेट फटका भारताला बसताना दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातून भारतासाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतीय चलनामध्ये घसरण सुरूच असून सोमवारी रुपयामध्ये अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रेकॉर्डब्रेक घसरण झाली आहे. रुपया पाहिल्यांदाच प्रती डॉलर 95.22 वर पोहोचला आहे. ही आता पर्यंतची सर्वात मोठी घसरण आहे. परदेशी गुंतवणूकदार सातत्याने कमी करत असलेली गुंतवणूक आणि इराण, अमेरिका, इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे मध्य पूर्वेत निर्माण झालेल्या तणावाचा भारतीय चलनावर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.