टीम इंडियाचा दणदणीत विजय; ठाकरेंनी फडकवला तिरंगा|VIDEO

Team India Wins T20 World Cup: टी-20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव करत विजेतेपद पटकावले. या ऐतिहासिक विजयाचा आनंद मुंबईतील शिवाजी पार्कवर अमित ठाकरे यांनी तिरंगा फडकवत साजरा केला.

टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताने दमदार कामगिरी करत न्यूझीलंडचा पराभव करून विजेतेपद पटकावले. या शानदार विजयासह भारताने टी-20 वर्ल्डकप इतिहासात तिसऱ्यांदा आपलं नाव कोरलं आहे. अंतिम सामन्यात भारतीय संघाने सर्वच आघाड्यांवर उत्कृष्ट खेळ करत न्यूझीलंडला पराभूत केले. या ऐतिहासिक विजयात अभिषेक शर्मा, ईशान किशन आणि संजू सॅमसन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागांत भारताने वर्चस्व राखत न्यूझीलंडला मोठ्या फरकाने नमवलं. संपूर्ण देशभर या विजयाचा जल्लोष साजरा केला जात असून क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. दरम्यान, टीम इंडियाच्या या विजयाचा आनंद साजरा करत मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी मुंबई येथील दादरमधील शिवाजी पार्कवर तिरंगा फडकवत जल्लोष साजरा केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com