किवीची फलंदाजी ढासळली; निम्मा संघ तंबूत परतला, टीम इंडिया जिंकणारच

India vs New Zealand final match : न्यूझीलंडची फलंदाजी ढासळली. न्यूझीलंडचा निम्मा संघ तंबूत परतला.
India vs New Zealand Head to Head T20I Matches
India vs New Zealand saam tv
Published On
Summary

टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर २५६ धावांचे लक्ष्य

टीम इंडियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची फलंदाजी ढासळली

किवी संघाचा निम्मा संघ तंबूत

टी२० वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचं पारडं जड झालं आहे. टीम इंडियाने दिलेल्या २५६ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या किवीची फलंदाजी ढासळली आहे. न्यूझीलंडचा निम्मा संघ तंबूत परतला आहे. न्यूझीलंडची ढासळती फलंदाजी पाहून टीम इंडिया जिंकण्याची दाट शक्यता आहे.

अर्शदीप सिंहने पहिल्या षटकात ४ धावा दिल्या. दुसरं षटक हार्दिक पंड्याने टाकलं. किवीच्या दोन षटकात २१ धावा झाल्या. त्यानंतर तिसऱ्या षटकात ३१ धावांवर न्यूझीलंडचा पहिला गडी बाद झाला. अक्षर पटेलने फिन एलनला बाद केले. चौथ्या षटकात न्यूझीलंडने जसप्रीत बुमराहने दुसरा गडी बाद केला. रचिन रवींद्रने दोन चेंडूत एक धावा करून बाद झाला.

India vs New Zealand Head to Head T20I Matches
मुंबईत पाणीबाणी! ऐन उन्हाळ्यात २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार, नेमकं कोणत्या भागात?

पाचव्या षटकात न्यूझीलंडचा तिसरा गडी बाद झाला. ग्लेन फिल्प्स पाच चेंडूत पाच धावा करून बाद झाला. अक्षर पटेलने ग्लेन फिल्प्सला तंबूत पाठवलं. सहाव्या षटकात बुमराहने फक्त ५ धावा दिल्या. ६ षटकात किवीचे ३ गडी गमावून ५२ धावा झाल्या होत्या. सातव्या षटकात कीवीच्या १६ धावा झाल्या. ७ षटकानंतर न्यूझीलंडचे ३ गडी बाद होऊन ६८ धावा कुटल्या. टिम सीफर्टने २३ चेंडूत ५० धावांवर आहे. त्याने २ चौकार आणि ५ षटकार लगावले होते.

India vs New Zealand Head to Head T20I Matches
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद वाढणार; राज ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय, मनसैनिक उद्यापासून कामाला लागणार

टीम सीफर्ट २६ चेंडूत ५२ धावा करून बाद झाला. ७२ धावांवर किवीचे ५ गडी बाद झाले. न्यूझीलंडचा निम्मा संघ गारद झाल्याने टीम इंडियाचा विजय निश्चित मानला जात आहे. टीम इंडिया जिंकल्यास तिसऱ्यांदा टी२० वर्ल्डकप जिंकणार आहे. याआधी टीम इंडियाने २००७ आणि २०२४ साली टी२० वर्ल्डकप जिंकला आहे. त्यामुळे टीम इंडियाला तिसऱ्यांदा टी२० वर्ल्डकप जिंकण्याची सुवर्णसंधी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com