Monsoon News: कोकणात मान्सूनची हजेरी, हापूस आंबा आणि काजू पिकांंना फटका, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण|VIDEO

Heavy Rains Lash Devgad: कोकणातील देवगड येथे मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे, यामुळे तेथील काजू आणि आंबा उत्पादकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

कोकणातील देवगडमध्ये मान्सूनने हजेरी लावली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड आणि वैभववाडी या भागांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाली असून गुरुवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पावसामुळे हापूस आंबा आणि काजू या पिकांवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे.

नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनचे नियोजित वेळेपेक्षा आठवडाभर आधीच आगमन झाले असून शुक्रवारी तो केरळमध्ये दाखल झाला आहे. 2009 नंतर प्रथमच मान्सून लवकर आला आहे. यावर्षी 23 मे रोजीच या पावसाने केरळमध्ये हजेरी लावली होती. दरवर्षी 1 जून रोजी मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल होत असतो. मात्र यावेळी तो लवकर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com