Mumbai Local Accident: गर्दीच्या रेटारेटीत लोकलमधून महिला खाली पडली|VIDEO

Diva-Mumbra Local Train Incident: दिवा-मुंब्रा मार्गावर सकाळच्या गर्दीच्या वेळी लोकलमधून महिला खाली पडल्याची घटना घडली. सिग्नलमुळे लोकल थांबलेली असताना महिलेचा तोल गेला. घटनेचा VIDEO समोर आला आहे.

मयूर राणे, साम टीव्ही

दिवा ते मुंब्रा या वळणावर लोकलमधून एक महिला खाली पडल्याची घटना आज सकाळी घडली. लोकलमध्ये नेहमी प्रमाणेच गर्दी असल्यामुळे महिलेचा तोल गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सकाळी 7.56 वाजता डोंबिवलीच्या दिशेने जाणारी लोकल दिवा स्थानकावरून पुढे जात होती. दिवा-मुंब्रा दरम्यानच्या वळणावर सिग्नलमुळे लोकल थांबली असताना ही महिला खाली पडली. सकाळच्या गर्दीच्यावेळी लोकलमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होती. गर्दीच्या रेटारेटीत महिलेचा तोल गेल्याने ती लोकलमधून खाली पडल्याचे दृश्यांमध्ये दिसत आहे. घटनेनंतर प्रवाशांमध्ये काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. लोकल सिग्नलवर थांबली असल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला. मात्र, या व्हिडिओमध्ये अनेक प्रवासी लोकलच्या दरवाजाला लोंबकळत प्रवास करताना दिसत असून, लोकलमधील जीवघेण्या गर्दीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com