पठ्याने चक्क पेट्रोलसाठी आणली 500 लिटरची टाकी, पाहा VIDEO

Diesel Stored In Water Tank Jalgaon Viral Video: जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील पेट्रोल पंपावर पाण्याच्या टाकीत डिझेल साठवताना आढळल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हरताळ फाटा परिसरातील एका पेट्रोल पंपावर चक्क पाण्याच्या टाकीत डिझेल भरताना आढळल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये सुमारे ५०० लिटर डिझेल पाण्याच्या टाकीत भरले जात असल्याचे दिसत आहे. या घटनेमुळे संबंधित पेट्रोल पंपावर नियमबाह्य साठेबाजी केली जात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे एकीकडे पेट्रोल-डिझेलसाठी ग्राहकांना रांगा लावाव्या लागत असताना, दुसरीकडे मोठ्या प्रमाणात डिझेल वेगळ्या टाकीत साठवले जात असल्याचा आरोप होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या प्रकरणाची संबंधित प्रशासनाने चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com