राज्यातील साडेचार लाख हेक्टर जमिनींचा प्रश्न सुटणार; देवस्थान जमिनींबाबतचा सरकारचा मोठा निर्णय

Devasthan Inam : राज्यातील साडेचार लाख हेक्टर जमिनींचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. सरकार देवस्थान जमिनींबाबत मोठा निर्णय घेणार आहे .

देवस्थान इनाम जमिनीबाबत राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. देवस्थान जमिनीबाबत सरकारने कायदा करण्याचं निश्चित केलं आहे.साडेचार लाख हेक्टर देवस्थान इनाम जमिनींबाबत सरकार निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार या जमिनींबाबत सुटसुटीत कायदा आणला जातोय. नव्या कायद्यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील रखडलेली विकासकामे मार्गी लागणार आहेत.

देवस्थान जमिनींबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, या जमिनी देवस्थान इनाममध्ये आहेत. त्या कुळाच्या आणि वहिवाटदाराच्या नावाने आहेत. मात्र त्यांचे हस्तांतरण बंद आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत कायदा आणण्यासाठी सूचना दिल्यात. पुढील तीन दिवसांत देवस्थान इनाम जमीन कायदा संकेतस्थळावर अपलोड केला जाईल. कुळधारक, वहिवाटदार यांचे अधिकार काय असतील, याबाबत सुटसुटीत कायदा असेल.

law for Devasthan Inam
आता जमिनीची वाटणी होणार मोफत, फडणवीस सरकारचा सर्वात मोठा निर्णय

'कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जमिनी हस्तांतरित होत नाहीत, विकासकामे अडली आहेत. त्यासाठी हा कायदा महत्त्वाचा आहे. अंतिम कायदा जुलै महिन्यात येईल. एनए कायदा बदलला पण प्रणाली विकसित केली नव्हती. आता अर्ज केल्यानंतर बीपीएमएसमध्ये एनए प्रिमीयर भरल्यानंतर स्टेटस दिसेल. महाआयटीने अद्ययावत प्रणाली तयारी केली आहे. त्यामुळे एनए अट रद्द केल्यानंतर प्रिमीयर भरण्याचा प्रश्न सुटला आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com