पहलगाम हल्ल्याचा बदला घेत भारताने चोख प्रत्युत्तर देत बुधवारी मध्यरात्री पाकिस्तान पोसत असणाऱ्या दहशतवाद्यांचा खातमा केला. यानंतर संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्व प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले, जम्मू काश्मीरमध्ये आतंगवाद पासरविण्याचा प्रयत्न होत होता. विशेषतः पहलगाममध्ये आमच्या बांधवांना मारण्यात आले. त्याचा संताप संपूर्ण भारतीयांच्या मनात होता. आज त्याचे निश्चितच समाधान सर्व भारतीयांना वाटत आहे, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. पहलगामच्या हल्ल्यानंतर मोदींनी ठणकावून सांगितले होते की हल्लेखोरांना जशास तसे उत्तर दिले जाईल. एक सबळ आणि ताकतवर उत्तर भारतीय सैन्याने दिले, त्यामुळे मी पंतप्रधान मोदी यांचे विशेष आभार मानतो असे ते म्हणाले.
मुंबई हल्ल्यामध्ये जो हफिज सईद, डेबिड हेडली यांचे प्रशिक्षण झाले ते अड्डे ही नष्ट करण्याच काम भारतीय सैन्याने केले आहे. दहशतवादाच्या विरोधात सर्वात मोठी कारवाई भारताने केली आहे. हा नवीन भारत आहे. हा अशा प्रकारचे हल्ले सहन करणार नाही असा दृढ विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
हा हल्ला झाल्यानंतर भारताने जगातील सर्व देशांना पटवून दिले की हा पहलगामचा हल्ला पाकिस्तान पुरस्कृत आहे. त्यामुळे संपूर्ण जग हे भारताचे पाठीमागे उभे राहिले.
राज ठाकरेंच्या वक्तव्याला महत्व देत नाही
राज ठाकरे काय बोलता याला महत्व नाही. संपूर्ण भारत हा आज समाधानी आहे. संपूर्ण देश हा या कारवाईच स्वागत करतो आहे आणि संपूर्ण जग हे भारतचे कौतुक करत आहे आणि पाठीशीही उभे आहे असे बोलत त्यांनी राज ठाकरे यांना प्रतिउत्तर दिले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.