निडवणूक आयोगावर होत असलेल्या आरोपांवरून विरोधकांनी देशभरात आरोपांची राळ उडवलीय. विरोधकांनीही मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही यात लक्ष्य केलं जातंय. दरम्यान, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करताना पंतप्रधान मोदींबाबत वादग्रस्त विधान केलंय. या विधानाची ऑडिओ क्लीप सध्या सगळीकडे व्हारयरल होतेय.
मल्लिकार्जुन खरगे हे बिहार राज्याच्या दौऱ्यावर आहेत. तेथील पटणा येथे काँग्रेसच्या कार्यक्रमात पक्षाच्या पदाधिकाऱ्यां संबोधताना वादग्रस्त विधान केलंय. आपल्या भाषणात ते सत्ताधारी पक्षावर टीका करत होते. परंतु भाषण सुरू असतानाच प्रेक्षकांमधील एका व्यक्तीने खरगे यांच्या मध्येच बोलत ‘मोदी जाएगा नही’ म्हणजेच मोदी सत्तेतून जाणार नाहीत, असं म्हटलं. त्यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्या तरुणाला मारहाण केली. संबंधित व्यक्तीचे हे विधान ऐकताच खरगे आक्रमक झाले. त्यांनी भाषण सुरू असतानाच ‘मोदी का बाप भी जाएगा’ असं विधान केलं. . त्यांच्या याच विधानावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.