गोपनीयतेची अट; बायकोलाही सांगू नका म्हणत मुख्यमंत्र्यांनी दिली राज्यसभेची उमेदवारी, VIDEO

Ramrao Vadkute Rajya Sabha Nomination Story: मुख्यमंत्र्यांनी राज्यसभेची उमेदवारी देताना “ही बातमी बायकोलाही सांगू नका” अशी अट घातल्याचा खुलासा नवनिर्वाचित खासदार रामराव वडकुते यांनी केला.

हिंगोली: राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार रामराव वडकुते हिंगोलीत आगमन झाल्यानंतर भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. या स्वागत सोहळ्यानंतर झालेल्या भाषणात वडकुते यांनी राज्यसभेच्या उमेदवारीमागील एक रंजक किस्सा सांगितला.

वडकुते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी त्यांना फोन करून राज्यसभेची उमेदवारी देण्याचा निर्णय कळवला. मात्र त्यावेळी मुख्यमंत्रीांनी एक अटही घातली. तुम्हाला राज्यसभेची उमेदवारी देण्यात येत आहे, पण ही बातमी बायकोलाही सांगू नका, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचा खुलासा वडकुते यांनी केला.

राज्यसभेच्या उमेदवारांची नावे जाहीर होण्यापूर्वी पूर्ण गोपनीयता राखणे किती महत्त्वाचे असते, याचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला. उमेदवारीची बातमी बाहेर जाऊ नये म्हणून ही खबरदारी घेतली गेल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com