Fadnavis - Bhujbal News : फडणवीस-भुजबळांचा एकत्र प्रवास, काय झाली चर्चा? पाहा Video

Naygav Savitribai Phule birthday tribute : नायगाव येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात येताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी एकाच गाडीमधून एकत्र प्रवास केला आहे.

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज नायगावमध्ये अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळ, पंकजा मुंडे, मकरंद पाटील, शिवेंद्र भोसले, शंभूराजे देसाई, अदिती तटकरे यांच्यासह भाजपच्या नेत्यांची हजेरी आहे. विशेष म्हणजे कार्यक्रम स्थळी येण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांनी एकाच गाडीतून प्रवास केला आहे. त्यांच्या या प्रवासामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

नायगाव याठिकाणी आज सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी होत आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर छगन भुजबळ यांनी एकत्र एकाच गाडीतून प्रवास केला आहे. राज्यात छगन भुजबळ यांची ओबीसी गटाची मोठी ताकद आहे. त्यातच त्यांना मंत्रिपद दिलेलं नसल्याने मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे. स्वत: भुजबळ यांनी देखील ही नाराजी बोलून दाखवली होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून मी बोलेन असं भुजबळ यांनी म्हंटलं होतं. त्यानंतर आज त्यांनी एकत्र प्रवास केला आहे. त्यामुळे त्यांच्यात काय चर्चा झाली? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. हेलीपॅडपासून फुले वाड्यापर्यंत त्यांनी हा एकत्र प्रवास केला आहे. यानंतर आजच्या भाषणातून छगन भुजबळ काय बोलतील हे पहाणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com