मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा थेट अजित पवारांना फोन; अन् उपस्थितांचे डोळे पाणावले|VIDEO

Chandrashekhar Bawankule Emotional Phone Call To Ajit Pawar: पुण्यातील एमईए इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पोदरम्यान मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांना केलेल्या भावनिक फोन कॉलमुळे कार्यक्रमातील उपस्थितांचे डोळे पाणावले.

मराठा आंत्रप्रेन्युअर्स असोसिएशनच्या (एमईए) वतीने आयोजित ‌एमईए इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो‌ला आजपासून सुरुवात झाली. पुणे येथील शिवाजीनगर येथील महाविद्यालयाच्या मैदानावर हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते आज सकाळी उद्घाटन झाले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहे. या निमित्ताने गायक अवधुत गुप्ते यांनी बावनकुळे यांची मुलाखत घेतली. यावेळी अवधुत गुप्ते यांनी बावनकुळे यांना फोन दिला आणि म्हणाले हा फोन तुम्ही कोणाला लावत आहात हे ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. बावनकुळे यांनी फोन थेट दिवंगत अजित पवारांना लावला आणि म्हणाले अजितदादा परत याना राज्याचा अर्थसंकल्प सादर करायाचा आहे, हे ऐकून उपस्थितांचे डोळे पाणावले. तसेच महाराष्ट्राने खूप काही गमावले असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com