चंद्रपुरात अचानक जमीन हादरली! भूकंपाच्या धक्क्याने नागरिकांमध्ये खळबळ|VIDEO

Chandrapur Earthquake Today 3.2 Magnitude Latest News: चंद्रपूर जिल्ह्यात आज दुपारी 4 वाजून 15 मिनिटांनी 3.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. कुरली गावाजवळ भूकंपाचा केंद्रबिंदू असून कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही.

मागच्या काही दिवसांपासून राज्यातील विविध ठिकाणी भूकंपाचे धक्के बसत आहे. नाशिकचच्या सुरगाणा तालुक्यात देखील अनेकवेळा भूकंपाचे धक्के बसले होते. यामुळे काही घरांना तडे देखील गेल्याचे पाहायला मिळाले. अशातच आज चंद्रपूर जिल्हयात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. भूकंप मापक यंत्रावर या भूकंपाची तीव्रता 3.2 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. दुपारी 4 वाजून 15 मिनिटे आणि 14 सेकंदांनी भूकंपाचा धक्का बसला. चंद्रपूर शहरापासून सुमारे 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या कुरली गावाजवळ भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती समोर आली आहे. जमिनीपासून सुमारे 5 किलोमीटर खोलीवर भूकंपाचे केंद्र होते.

भूकंपाचा सौम्य धक्का जाणवल्यानंतर परिसरात काहीवेळ भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.