देवेंद्र फडणवीसांकडे दैवी शक्ति, ते वयाच्या 27 व्या वर्षी...; चंद्रकांत पाटील हे काय बोलून गेले? VIDEO

Chandrakant Patil Statement On Devendra Fadnavis Divine Power: भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ‘दैवी शक्ती’ असल्याचे विधान केले असून त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

भाजपचे नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक अजब विधान केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ते म्हणाले देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीसाठी पहाटे चार वाजता पत्रकार परिषद घ्यायला लावली होती. अनेक मुख्यमंत्री होऊन गेले. मात्र मराठा आरक्षण संदर्भात सामान्य माणसाची परिस्थिति सुधारली असे काम कोणीच केले नाही. असे चंद्रकांत पाटील म्हणाले. दुसरीकडे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दैवी शक्ती आहे. वयाच्या 27 व्या वर्षी ते महापौर होते. ज्या महापौर परिषदेचे ते अध्यक्ष होते, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. त्यांच्या या व्यक्तव्याची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com