Mumbai Local: मुंबई लोकल आता सुसाट धावणार, लांबपल्ल्याच्या गाड्यांना मुंबईच्या वेशीवर रोखलं जाणार

Central Railway: मुंबईकरांचा प्रवास आता सुसाट होईल. मध्य रेल्वे मार्गावरील लोकल वेळेत धावणार आहेत. कारण लांबपल्ल्यांच्या गाड्यांना मुंबईच्या वेशीवर रोखलं जाणार आहे. लोकलला प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे.

मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी मोठी आणि दिलासा देणारी बातमी आहे. मध्य रेल्वेवरून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास सुसाट होणार आहे. लोकलचा खोळंबा करणाऱ्या लांबपल्ल्याच्या गाड्यांना रेल्वे प्रशासनाने रेड सिग्नल दाखवला आहे. सकाळच्या गर्दीच्या वेळी उत्तर भारतातून येणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांमुळे लोकलचं वेळापत्रक कोलमडतं. त्यामुळे प्रशासनाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे.

एक्स्प्रेस गाड्यांना आता मुंबईच्या वेशीवरच रोखून धरलं जाईल. चाकरमान्यांच्या लोकलला प्रथम प्राधान्य दिले जाईल. लोकल उशिराने धावत असल्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला. प्रवाशांच्या संतापानंतर आता रेल्वे प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले आहे. त्यामुळे आता लोकलचा प्रवास आता सुसाट होणार आहे. लोकल वेळेमध्ये धावणार आहेत.

उत्तरेकडून येणाऱ्या लांबपल्ल्याच्या गाड्यांमुळे लोकल वाहतुकीवर परिणाम होता. आता या लांबपल्ल्यांच्या गाड्यांसाठी लोकल थांबवणं बंद होणार आहे. टिटवाळा आणि आसनगाव स्थानकाजवळ एक्स्प्रेसला रोखून धरले जाणार आहे. त्यामुळेच पिक अवर्समध्ये लोकल सुसाट धावणार आहेत. परिणामी लोकल प्रवाशांचा प्रवास सुसाट आणि गर्दीमुक्त होण्यास मदत होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com