Pune–Mumbai Expressway Traffic Update: पुणे-मुंबई प्रवास टाळाच, २४ तासांपासून वाहनांच्या रांगाच रांगा, पर्यायी मार्ग कोणते?

Mumbai-Pune Expresss Way Traffic Jam Update : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील आडोशी बोगद्याजवळ केमिकल टँकर उलटून गॅस गळती सुरू असल्याने गेल्या २४ तासांपासून वाहतूक ठप्प आहे. सुरक्षेच्या कारणास्तव प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Mumbai Pune Expressway latest traffic update : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ एक केमिकल टँकर उलटल्याने या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. . या टँकरमधून ज्वालाग्रही गॅसची गळती होत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाकडून पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

गेल्या २४ तासांपासून ही परिस्थिती कायम असून दोन्ही मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. प्रशासनाकडून युद्धपातळीवर टँकर हटवण्याचे काम सुरू आहे. पण जोपर्यंत परिस्थिती नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत प्रवाशांनी या मार्गावरून प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रवाशांनी पर्यायी मार्ग वापरावा असे सांगण्यात आले. चांदणी चौक ते घाट रायगड अथवा आळे फाटा माळशेज घाट ते ठाणे मार्गे मुंबईकडे जावावे, असे सांगण्यात आले आहे. शक्य असल्यास आजचा प्रवास रद्द करून घरूनच काम करावे, अशी विनंती प्रशासनाने केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com