Beed Crime: बीडमधील आणखी एक व्हिडिओ समोर, मनोज जरांगे समर्थकांकडून एकाला बेदम मारहाण, VIDEO

Beed Violence: सरपंच संतोष देशमुख यांचा हत्याकांड आणि वाल्मीक कराडने माजवलेली दहशत तसेच सतीश भोसले उर्फ खोक्याची गुंडगिरी या सर्व प्रकरणामुळे बीड जिल्हा हा हादरून गेला आहे. अशातच आज अजून एक व्हिडिओ समोर आला आहे.

बीडमधील गुन्हेगारी काही कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाहीये. रोज एक ना एक मारहाणीचा व्हिडिओ समोर येत आहे. सुरुवातीला धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी केलेल्या मारहाणीचे व्हिडिओ समोर येत होते. त्यानंतर भाजप आमदार सुरेश धस यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या ढाकणे कुटुंबाला मारहाणीचा व्हिडिओ समोर आला होता. आता सुरेश धस यांच्या कार्यकर्त्याला मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सामोर आला आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला मदत करण्याच्या नावाखाली सरकारी अधिकाऱ्यांकडून पैसे उकळत असल्याचा आरोप या व्यक्तीवर केला जात आहे. आशिष विशाल असे या व्यक्तीचे नाव आहे. तसेच या माणसावर कडक कारवाई करावी अशी मागणी जरांगे पाटील यांच्या समर्थकांकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com