सुनेत्रा पवारांनी भेट घेतल्यानंतर गृहमंत्री अमित शाहांचं ट्विट | VIDEO

Amit Shah Emotional Tweet After Meeting Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर अमित शाह यांनी भावनिक ट्विट करत प्रतिक्रिया दिली.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल आपल्यापदाचा पदभार स्वीकारताच दिल्लीला रवाना झाल्या. आज त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत जय आणि पार्थ पवार तसेच सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हे उपस्थित होते. ही भेट झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करत भावनिक प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्रच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारजी यांची भेट झाली. आपले सर्वांचे लाडके स्व. अजित पवारजी यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात जी पोकळी निर्माण झाली आहे, ती भरून काढणे सहज शक्य नाही. परंतु, जनकल्याण आणि राज्याच्या विकासाचे त्यांचे स्वप्न साकार करणे हे आपल्या सर्वांचे सामायिक कर्तव्य आहे; ज्यामध्ये तुमचा संकल्प अत्यंत उपयुक्त ठरेल. असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com