Ambenali Ghat : आंबेनळी घाटात दरड कोसळली, पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील वाहतूक २ तास ठप्प

Ambenali Ghat Landslide : पोलादपूर - महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात दरड कोसळली. यामुळं दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती.

सचिन कदम, रायगड | साम टीव्ही

पहिल्याच मुसळधार पावसाचा फटका पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील (Poladpur- Mahabaleshwar Highway) वाहतुकीला बसला. पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या आंबेनळी घाटात आज, मंगळवारी दरड कोसळली. मुसळधार पावसामुळं पायटा ते कुंभळवणे फाटा या दरम्यान दरड (Landslide) कोसळली. काही झाडांसह मातीचा ढिगारा रस्त्यावर आला. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक काही तासांसाठी पूर्णपणे ठप्प झाली होती. स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून रस्त्यावरील मातीचा ढिगारा हटवण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले. ढिगारा हटवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. तसेच या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.

दरम्यान, आंबेनळी घाट रस्त्यावरील मलबा हटवण्याचे काम पूर्ण झाले आहे. पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली आहे. जवळपास दोन तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com