Akshay Shinde : ‘त्याला जंगलात टाका..’, अक्षय शिंदेच्या दफनविधीस विरोध, पाहा व्हिडीओ
Badlapur Encounter News : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर आठवड्याभरापूर्वी झाला. अक्षय शिंदे याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंबियांना स्मशानभूमित जागाच मिळत नाही. यासाठी त्यांनी कोर्टातही धाव घेतली. कोर्टाने राज्य सरकारला सोमवारपर्यंत अंत्यविधी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पण नागरिक आणि राजकीय पक्षाकडून अक्षय शिंदे याच्या दफनभूमिकासाठी परवानगी दिली जात आहे. अंबरनाथ आणि उल्हासनगरमध्ये अक्षय शिंदे याच्यावर अंत्यसंस्कार करण्यास विरोध करण्यात आला. त्याला जंगलात टाका, नाहीतर नदीत सोडा..अशी भूमिका स्थानिकांनी घेतली.
अक्षय शिंदे याचा मृतदेह दफन करण्यासाठी अनेक ठिकाणी विरोध केला जातोय. हायकोर्टाने सोमवारपर्यंत अक्षय शिंदेंचा मृतदेह दफन करा असे महत्त्वपूर्ण आदेश राज्य सरकारला दिलेत. या आदेशानंतरही अक्षय शिंदेच्या मृतदेहाच्या दफनविधीसाठी जागा मिळत नसल्याचे चित्र आहे. बदलापूरनंतर उल्हासनगरमध्येही अक्षय शिंदे याचा मृतदेह दफन करण्यास विरोध केला जात आहे.
अक्षय शिंदेचा मृतदेह पुरण्यासाठी खोदलेला खड्डा हा शिंदे गटाकडून बुजवण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. तर अक्षय शिंदे हा बदलापूरचा आहे. त्यामुळे त्याचे अंत्यविधी तिथेच करा, अशी स्थानिकांची मागणी आहे. ‘जिकडे अक्षय शिंदे राहतो, जिकडे त्याची हद्द आहे, तिथेच त्याला न्या.. कोणत्याही जंगलात त्याला टाका, नदीत टाका पण इथे अक्षय शिंदेचा मृतदेह इथे आणायचा नाही.’, असे म्हणत स्थानिकांनी विरोध दर्शविल्याचे पाहायला मिळत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.