Ajit Pawar Death: आज ही शेवटची पहाट दादांना भेटायला यायची, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या ढसाढसा रडल्या; पाहा VIDEO

Ajit Pawar Plane Accident: अजित पवार यांचा बारामतीमध्ये विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. त्यांच्या निधनामुळे राज्याला मोठा धक्का बसला. अजित पवार यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहे. त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी बारामतीत कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी विमान अपघातामध्ये निधन झाले. अजित पवारांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. राज्यातील सर्वच पक्षाचे नेते मंडळींनी बारामती गाठले आहे. अजित पवारांच्या अंतिम दर्शनसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. अजित पवार यांना शेवटचा निरोप देत असताना त्यांना अश्रू अनावर झाले. हक्काचा आणि आपली कामं करणारा माणूस गमावल्याने त्यांना प्रचंड दु:ख झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या वैशाली नागवडे या देखील यावेळी धायमोकलून रडल्या. 'अजित पवारांसोबत त्यांनी गेली २५ वर्षे पक्षाचे काम केले. यावेळी त्यांनी सांगितले की, 'आम्हाला पाहटे फक्त काटेवाडीला आणि दादांच्या घरी मुंबईला देवगिरीला जायची सवयी आहे. आज ही शेवटची पाहट आहे दादांना भेटायला यायची. पण दादा कुठेच नाहीत. दादा दादा होते. कुणी दादांची जागा नाही घेऊ शकत. आज आमच्या हक्काचा माणूस गेला आहे. आम्हाला कार्यकर्त्यांना कळत नाहीये कुठे गेले दादा. गेली २५ वर्षे दादांच्या नेतृत्वाखाली मी काम केले राजकारणात. अनेक संघर्ष करावे लागले. पण दादांना हाच शब्द होता की दादा शेवटपर्यंत तुमच्यासोबत राहिन कुणालासोबत जाणार नाही.', अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com