अहमदाबादहून लंडनच्या दिशेने निघालेल्या एअर इंडिया एआय- 171 विमानाचा गुरुवारी भीषण अपघात झाला. गुरुवारी दुपारी सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर केवळ काहीच मिनिटांत एअर इंडियाचे विमान मेघानीनगर परीसरात कोसळले होते. या भीषण दुर्घटनेत 270 जणांचा मृत्यू झाला. आता या अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताचा नवा थरारक व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओत मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलला विमान धडकल्यानंतर, अनेक विद्यार्थी घाबरून इमारतीवरून उड्या मारताना दिसत आहेत. विमान हॉस्टेलवर आदळल्यामुळे मोठा स्फोट आणि आग लागली होती. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून, जीव वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांनी केलेल्या धडपडीचे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.