Sandeep Gaykar : वीर जवान अमर रहे! शहीद संदीप गायकर यांना अखेरचा सलाम, लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

Indian Army Soldier, Sandeep Gaikar News : काश्मीरमध्ये शहीद झालेल्या अहिल्यानगरचे जवान संदीप गायकर यांच्यावर ब्राम्हणवाडा येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. संदीप यांच्या अंत्यदर्शनासाठी गावात भावनिक वातावरण निर्माण झाले होते.

Shaheed Sandeep gaikar final rites : काश्मीरमध्ये शहिद झालेले अहिल्यानगरचे जवान संदीप गायकर यांच्यावर आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. किश्तवाड सेक्टरमध्ये सीमेवर कर्तव्य बजावत असताना दहशतवाद्यांच्या गोळीबारात संदीप शहीद झाले होते. त्यांच्या पार्थिवावर ब्राह्मणवाडामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद जवान संदीप गायकर यांच्या अंत्य दर्शनासाठी जनसागर लोटला होता.

ब्राम्हणवाडा गावातील ज्या सह्याद्री विद्यालयात संदीप यांनी शिक्षण घेतले त्याच विद्यालयाच्या मैदानावर त्यांचा अंत्यविधी झाला. भारत माता की जय... शहीद जवान संदिप गायकर अमर रहे च्या घोषणांनी परिसर दुमदुमला. राष्ट्रध्वज स्वीकारताना संदीप यांच्या पत्नी दिपा यांनी भारत माता की जय अशा घोषणा दिल्या. अहिल्यानगर पोलिस दल आणि लष्कराकडून संदीप गायकर यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी कुटुंबियांच्या अश्रुचा बांध फुटला होता. संदीप यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दीड वर्षाचा मुलगा आणि दोन बहि‍णी आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com