धर्मेंद्र प्रधानांनंतर आता महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

Dada Bhuse Resignation demand : नीट पेपरफुटीप्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसच्या तरुण नेत्यांनी महाराष्ट्राकडे मोर्चा वळवला आहे. प्रधानांप्रमाणे शिक्षण मंत्री दादा भुसेंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केलीय.

नीट पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. महिनाभरापेक्षा जास्त काळ दिल्लीतील जंतरमंतरवर सीजेपीच्या नेतृ्त्वात तरुणांनी आंदोलन केलं होतं. धर्मेंद्र प्रधान यांनी या सगळ्याची जबाबदारी स्वीकारून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी प्रमुख मागणी तरुणांनी केली होती. अखेर सरकारला सर्व मागण्या मान्य कराव्या लागल्या. प्रधान यांचा राजीनामा घेण्यात आला. आता युवकांचा मोर्चा महाराष्ट्रातील शिक्षण मंत्र्यांकडे वळला आहे. प्रधान यांच्याप्रमाणे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी मुंबई युवक काँग्रेसने केली आहे. राज्यात पेपर फुटल्यावर भुसे यांनी जबाबदारी घेतली नसल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला आहे.

दादा भुसे यांनीही नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. जर त्यांनी येत्या सात दिवसांत भुसेंनी राजीनामा दिला नाही तर, महाराष्ट्रातील सर्व समविचारी संघटनांसोबत आमचा संपर्क झाला आहे. त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. सर्व जण या मुद्द्यावर सकारात्मक पद्धतीने पुढे जाण्यात तयार आहेत. सर्व संघटना एकत्र येऊन राज्यात तीव्र आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com