WTC Scenario: भारत- ऑस्ट्रेलियासह या 5 संघांमध्ये चुरशीची लढत; पाहा समीकरण

WTC Final Scenario: भारत आणि ऑस्ट्रेलियाला फायनलमध्ये जाण्याची संधी आहे, यासह आणखी ३ संघांना देखील फायनलमध्ये जाण्याची संधी असणार आहे.
WTC Scenario: भारत- ऑस्ट्रेलियासह या 5 संघांमध्ये चुरशीची लढत; पाहा समीकरण
team indiatwitter
Published On

WTC Final Scenario: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्याची लढत आणखी रोमांचक झाली आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय संघाला फायनलमध्ये जाण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. मात्र आता न्यूझीलंडविरुद्धच्या सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे भारतीय संघासह ५ संघांना फायनलमध्ये जाण्याची संधी निर्माण झाली आहे. दरम्यान कसं असेल समीकरण? जाणून घ्या.

भारतीय संघ -

भारतीय संघ सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. भारताची विजयाची सरासरी ही ६२.८२ इतकी आहे. भारतीय संघाला इथून पुढे ६ सामने खेळायचे आहेत. या ६ पैकी जर ४ सामने जिंकले, तर भारतीय संघ फायनलसाठी पात्र ठरू शकतो. भारतीय संघाची विजायची सरासरी ७४.५६ वर जाऊन पोहचेल.

WTC Scenario: भारत- ऑस्ट्रेलियासह या 5 संघांमध्ये चुरशीची लढत; पाहा समीकरण
IND vs NS Toss: कोणाचा विजयरथ थांबणार? महत्वाच्या सामन्यात टीम इंडियाने जिंकला टॉस; 2 बदलांसह उतरणार मैदानात

ऑस्ट्रेलिया -

ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाची विजयाची सरासरी ही ६२.५० इतकी आहे. ऑस्ट्रेलियाने जर पुढील सर्व सामने जिंकले, तर हा संघ ७६.३२ वर जाऊन अव्वल स्थानी पोहचू शकतो. ऑस्ट्रेलियाचा संघ ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाचा सामना करणार आहे. ही मालिका दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाची असणार आहे.

श्रीलंका -

श्रीलंकेने काही दिवसांपूर्वी न्यूझीलंडला २-० ने पराभूत केलं होतं. ही मालिका जिंकल्यानंतर श्रीलंकेने या शर्यतीत प्रवेश केला आहे. श्रीलंकेचा संघ ५५.५६ पॉईंट्ससह तिसऱ्यास स्थानी आहे. श्रीलंकेला इथून पुढे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचा सामना करायचा आहे.

WTC Scenario: भारत- ऑस्ट्रेलियासह या 5 संघांमध्ये चुरशीची लढत; पाहा समीकरण
Rohit Sharma: WTC चा विचार करत नाहीये, मला फक्त...; सिरीज गमावल्यानंतर काय म्हणाला रोहित शर्मा?

न्यूझीलंड

न्यूझीलंडचा संघ या शर्यातीतच नव्हता, मात्र भारतीय संघाविरुद्धच्या मालिकेत सलग २ सामने जिंकल्यानंतर, न्यूझीलंडलाही आता फायनलमध्ये जाण्याची संधी असणार आहे. न्यूझीलंडचा संघ ही स्पर्धा जिंकणारा पहिलाच संघ आहे.

दक्षिण आफ्रिका-

दक्षिण आफ्रिकेचा संघही या शर्यतीत आहे,मात्र या संघाचा फायनलमध्ये जाण्याचा मार्ग खडतर असणार आहे. कारण या संघाला उर्वरित सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. यासह इतर संघाच्या निकालावर अवलंबून राहावं लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com