पुणे टेस्टमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. सलग झालेल्या या दुसऱ्या पराभवामुळे टीम इंडियाला न्यूझीलंडविरूद्धची सिरीज देखील गमवावी लागली. दरम्यान या पराभवानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मा काहीसा नाराज असल्याचं दिसून आला. भारतीय टेस्टच्या इतिहासात हे प्रथमच घडलं ज्यावेळी न्यूझीलंडच्या टीमने भारतात येऊन टेस्ट सिरीज जिंकली. तब्बल 70 वर्षांनंतर किवी टीमने पहिल्यांदाच भारतात टेस्ट सिरीज जिंकली.
न्यूझीलंड विरूद्ध झालेल्या पराभवानंतर घरच्या मैदानावर सलग 18 टेस्ट सिरीज जिंकण्याचा टीम इंडियाचा विजय रथही थांबला. 3 सामन्यांच्या सिरीजमध्ये न्यूझीलंड 2-0 ने आघाडी घेतलीये. दरम्यान या पराभवामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचा मार्ग खडतर झालाय . याबाबत रोहित शर्माला विचारलं असता त्याने सांगितलं की, अजूनही त्याची नजर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलवर नाहीये.
न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा दुसरा टेस्ट सामना गमावल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला की, 'मला फार वाईट वाटतंय कारण आम्हाला पराभवाला सामोरं जावं लागलंय. पुढे काय होणार आहे आणि त्याचा आमच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या शक्यतांवर परिणाम होईल की नाही याबद्दल मी आत्ताच विचार करत नाहीये. आम्ही चांगली कामगिरी केली नाही. त्यामुळे ही सिरीज आमच्यासाठी वाईट ठरली. आम्हाला काही गोष्टींवर युनिट म्हणून काम करावं लागणार आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि शेवटचा टेस्ट सामना १ नोव्हेंबरपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. तिसऱ्या टेस्ट सामन्यात रोहितने चांगल्या कामगिरीची आशा व्यक्त केलीये. रोहित म्हणाला की, 'आम्हाला वानखेडेवर चांगली कामगिरी करायचीये. हा टेस्ट सामना जिंकण्यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागणार आहे. दोन सामने गमावल्याचं हे आमच्या संपूर्ण टीमचं अपयश आहे. एका चांगल्या हेतूने आणि रणनीतीने वानखेडेमध्ये खेळण्यास उतरणार आहोत.
रोहितच्या म्हणण्यानुसार, 'आम्ही जसा विचार केला होता, तसं काहीच घडू शकलं नाही. पण न्यूझीलंडला क्रेडिट द्यावं लागणार आहे. त्यांनी खरंच चांगला खेळ केला. आम्हाला काही ठिकाणी संधी मिळाली होती, मात्र आम्ही त्या संधीचा फायदा घेऊ शकलो नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.