IND vs SL W : भारताच्या लेकींनी श्रीलंकेला चारली धूळ; टॉप-२ मध्ये हरमनसेनेची एन्ट्री

IND vs SL W match update : भारताच्या लेकींनी श्रीलंकेविरुद्ध कमाल केली आहे. भारताने ८२ धावांनी श्रीलंकेला धूळ चारली.
IND W vs PAK W: भारताच्या रणरागिणी पाकिस्तानवर पडल्या भारी! हरमनप्रीत शेवटपर्यंत लढली
team indiatwitter
Published On

नवी दिल्ली : महिला २० वर्ल्ड कप २०२४ चा १२ वा सामना भारत आणि श्रीलंकेदरम्यान झाला. दोन्ही संघामध्ये दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये सामना झाला. या सामन्यात भारताच्या स्मृती मंधाना आणि कर्णधार हरमनप्रीत कौरने दमदार अर्धशतक ठोकलं. तसेच शेफालीच्या खेळाच्या जोरावर भारताने २० षटकात १७२ धावा कुटल्या. त्यानंतर या धावांचा पाठलाग करण्यास उतरलेल्या श्रीलंकेला भारताने सहज गुंडाळलं. भारताने श्रीलंकेवर ८२ धावांनी विजय मिळवला.

या सामन्यात भारतीय महिला संघाने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सार्थ ठरवत भारतीय फलंदाजांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांना चांगलच धुतलं. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना शेफाली वर्माने शानदार सुरुवात करून देत ४३ धावांची खेळी केली. तर तिला साथ देत स्म्रिती मंधानाने ५० धावांची खेळी केली.

IND W vs PAK W: भारताच्या रणरागिणी पाकिस्तानवर पडल्या भारी! हरमनप्रीत शेवटपर्यंत लढली
IND W vs SL W: टीम इंडियासाठी गुड न्यूज! महत्वाच्या सामन्यात स्टार खेळाडू खेळणार; उप-कर्णधाराने दिली मोठी अपडेट

दोघांनी पहिल्या विकेटसाठी ९८ धावांची रेकॉर्डब्रेक भागीदारी केली. शेवटी फलंदाजी करताना हरमनप्रीत कौरने २७ चेंडूत नाबाद ५२ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने ३ गडी बाद १७२ धावांपर्यंत मजल मारली.

IND W vs PAK W: भारताच्या रणरागिणी पाकिस्तानवर पडल्या भारी! हरमनप्रीत शेवटपर्यंत लढली
IND vs BAN, 2nd T2OI: टीम इंडियाच्या विजयाची सप्तमी! बांगलादेशला नमवत मालिकेत घेतली २-० ची विजयी आघाडी

श्रीलंकेवर ८२ धावांनी एकतर्फी विजय

या सामन्यात श्रीलंकेला जिंकण्यासाठी १७३ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेकडून कर्णधार संजीवनीने २० तर दिल्हारीने २१ धावांची खेळी केली. मात्र फलंदाजांनंतर भारतीय गोलंदाजही चमकले. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना अरुंधती रेड्डी आणि सोभानाने प्रत्येकी ३-३ गडी बाद केले. तर रेणुका सिंगने २, श्रेयांका पाटील, दिप्ती शर्मा यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com