Ind Vs Pak : भारत - पाकिस्तान हायव्होल्टेज सामना होणार रद्द? मोठी अपडेट आली समोर

Ind Vs Pak T20 World Cup : टी २० वर्ल्डकपमध्ये १५ फेब्रुवारीला होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान सामन्याआधी मोठी अपडेट समोर आली आहे. श्रीलंकेच्या हवामान विभागानं १५ तारखेसाठी पावसाचा इशारा दिला आहे.
Ind Vs Pak  : भारत - पाकिस्तान हायव्होल्टेज सामना होणार रद्द?
india pakistan match weather alert colombosaam tv
Published On

t20 world cup india pakistan rain forecast : टी २० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांमध्ये होणाऱ्या सामन्याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामना १५ फेब्रुवारीला श्रीलंकेतील कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे.

भारतीय संघानं या स्पर्धेतील दोन सामन्यांमध्ये एकतर्फी विजय मिळवला आहे. पाकिस्तान संघाला नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात निसटता विजय मिळाला होता. त्यासाठी त्यांना झुंजावे लागले होते. तर यूएसएविरुद्धचा सामनाही पाकिस्तानला खिशात घातला होता. आता भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होत आहे.

या सामन्यातील विजयी संघ सुपर ८ मध्ये क्वालिफाय होणार आहे. या सामन्याबाबत क्रिकेट विश्वात प्रचंड उत्सुकता आहे. मात्र, हा सामना रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (india pakistan match weather alert colombo) कारण श्रीलंकेच्या हवामान विभागानं १५ फेब्रुवारीला कोलंबोतील हवामानविषयक अंदाज व्यक्त केला आहे. हा अंदाज व्यक्त करताना हवामान विभागानं पावसाचा इशारा दिला आहे.

पावसाचा अलर्ट

श्रीलंकेच्या हवामान विभागानं वेदर बुलेटिन प्रसारित केलं आहे. १५ फेब्रुवारीला पावसाचा अलर्ट दिला आहे. बंगालच्या दक्षिण-पूर्व खाडीत एक कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची दाट शक्यता आहे. नॅचरल हॅजर्ड्स अर्ली वॉर्निंग सेंटरनं १३ फेब्रुवारीला सकाळी साडेदहाला नोटीस प्रसिद्ध केली असून, हवामानविषयक अंदाज आणि बुलेटिनकडं विशेष लक्ष देण्यात यावं, असं आवाहन केलं आहे. अॅक्युवेदरनंही १५ फेब्रुवारी रोजी कोलंबोमध्ये पावसाची शक्यता ९३ टक्क्यांपर्यंत आहे, असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळं हवामान खात्याचा अंदाज खरा ठरल्यास हा सामना रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सामन्याआधी पाऊस थांबण्याची चिन्हे

श्रीलंकेच्या कोलंबोत १५ फेब्रुवारीला आर प्रेमदासा स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना होत आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता हा सामना सुरू होईल. अॅक्युवेदरच्या रिपोर्टनुसार, त्यावेळेला पावसाची शक्यता केवळ ९ टक्के असेल. दुसरीकडं संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पावसाची शक्यता ४९ टक्क्यांपर्यंत आहे. त्यामुळं नाणेफेकीला उशीर होऊ शकतो. त्यानंतरही ढगांची गर्दी असेल, पण पावसाचं सावट कमी होण्याची शक्यता आहे.

Ind Vs Pak  : भारत - पाकिस्तान हायव्होल्टेज सामना होणार रद्द?
T20 World Cup Ind vs Pak: क्रिकेटमध्ये देशप्रेम की पैसाप्रेम? ICC ने दम दिल्यानंतर पाकिस्तानचा यू-टर्न

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com