Ricky Ponting, Delhi Capitals : दिल्ली कॅपिटल्सने रिकी पाँटिंगची सुट्टी का केली? धक्कादायक कारण आलं समोर

Ricky Ponting On Delhi Capitals Head Coach Position: ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू रिकी पाँटिंगने दिल्ली कॅपिटल्स संंघाची साथ का सोडली याबाबत मोठं कारण समोर आलं आहे.
Ricky Ponting, Delhi Capitals: दिल्ली कॅपिटल्सने रिकी पाँटिंगची सुट्टी का केली? धक्कादायक कारण आलं समोर
ricky ponting yandex
Published On

Ricky Ponting, Delhi Capitals : ऑस्ट्रेलियाचा माजी स्टार फलंदाज रिकी पाँटिंग (Ricky Ponting) गेल्या काही वर्षांपासून आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघासाठी प्रशिक्षकाची भूमिका पार पाडतोय. मात्र गेल्या महिन्यात त्याने दिल्ली कॅपिटल्स संघाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला होता. रिकी पाँटिंगच्या मार्गदर्शनाखाली खेळताना दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. या संघाला केवळ एकदाच फायनलमध्ये प्रवेश करता आला आहे. दरम्यान रिकी पाँटिंगने दिल्ली कॅपिटल्स संघाची साथ का सोडली? याबाबत धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.

दिल्लीतून का निघाला, पाँटिंगने सांगितलं कारण...

रिकी पाँटिंगने आयसीसी रिव्यू या पॉडकास्टमध्ये सहभाग घेतला होता. या पॉडकास्टमध्ये बोलताना तो म्हणाला की,' मला तरी हेच वाटतंय की, दिल्ली कॅपिटल्स संघासाठी भारतीय प्रशिक्षकाची नेमणूक केली जाऊ शकते. त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं होतं की, त्यांना असा प्रशिक्षक हवा आहे, तो स्पर्धा सुरु असताना आणि स्पर्धा सुरु नसतानाही खेळाडूंना वेळ देऊ शकेल. जर भारतीय प्रशिक्षक असेल, तर तो स्थानिक खेळाडूंना अधिक वेळ देऊ शकतो. मी माझ्या इतर कामांमुळे हे करु शकत नव्हतो.' हे एक कारण असलं, तरीदेखील रिकी पाँटिंगने मान्य केलंय की, संघाच्या फ्लॉप शो मुळेही त्याला हे पद गमवावं लागलं आहे.

तसेच तो पुढे म्हणाला की, 'मला आयपीएल स्पर्धेत पुन्हा एकदा प्रशिक्षण द्यायला आवडेल. मी एक खेळाडू म्हणून असेल किंवा प्रशिक्षक म्हणून, मी खूप चांगला खेळ घालवला आहे.'

Ricky Ponting, Delhi Capitals: दिल्ली कॅपिटल्सने रिकी पाँटिंगची सुट्टी का केली? धक्कादायक कारण आलं समोर
IPL 2025 Mega Auction: IPL मेगा ऑक्शनमध्ये हे नवे नियम लागू केले जाणार? किती खेळाडू रिटेन करता येणार?

'मी दिल्ली कॅपिटल्स संघासोबत ७ वर्ष काम केलं. दुर्दैवाने मला आणि फ्रेंचायझीला जे हवं होतं ते काहीचं झालं नाही. आमचं एकच उद्देश्य होतं ,ते म्हणजे संघासाठी ट्रॉफी जिंकणं. मात्र असं होऊ शकलं नाही.' असं रिकी पाँटिंग म्हणाला.

रिकी पाँटिंग गेल्या ७ वर्षांपासून दिल्ली कॅपिटल्स संघाला प्रशिक्षण देतोय. मात्र त्याच्या मार्गदर्शनाखाली खेळताना दिल्लीला आयपीएलची एकही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. दिल्लीने केवळ १ वेळेस आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी श्रेयस अय्यर हा दिल्लीचा कर्णधार होता. मात्र या सामन्यातही दिल्लीला विजय मिळवता आला नव्हता.

Ricky Ponting, Delhi Capitals: दिल्ली कॅपिटल्सने रिकी पाँटिंगची सुट्टी का केली? धक्कादायक कारण आलं समोर
Mumbai Indians,IPL 2025: मुंबई इंडियन्स हार्दिक पंड्याला रिलीझ करणार? हा खेळाडू होऊ शकतो नवा कर्णधार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com