

PBKS vs GT Match Preview: पंजाब किंग्ज संघाचा आक्रमक फलंदाज आणि कर्णधार शिखर धवनने ९९ धावांची खेळी करूनही पंजाब किंग्ज संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात पंजाबची सलग तिसरा विजय मिळवण्याची संधी हुकली होती.
तर गुजरात टायटन्स संघ विजयाच्या अगदी जवळ असताना, रिंकू सिंगने सलग ५ षटकार मारले आणि गुजरात टायटन्स संघावर जोरदार विजय मिळवला होता. आज पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. (PBKS VS GT Match Prediction)
पंजाब किंग्ज संघाबद्दल बोलायचं झालं तर, लियाम लिविंगस्टनचे पुनरागमन होणार असल्याने पंजाब किंग्जची फलंदाजी आणखी बळकट होणार आहे. तर गुजरात टायटन्स संघातील फलंदाज विजय शंकर आणि साई सुदर्शन देखील तुफान फॉर्ममध्ये आहेत. (PBKS Vs GT Match Prediction)
पिच रिपोर्ट.. (PBKS Vs GT Live Updates)
पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर धावांचा पाऊस पाडला जाऊ शकतो. ही खेळपट्टी फलंदाजांसाठी फायदेशीर ठरू शकते. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने जर २१० धावा केल्या तर तो संघ विजयाचा प्रबळ दावेदार ठरू शकतो. (Latest sports updates)
PBKS Vs GT Playing XI
पंजाब किंग्स :
शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, मॅथ्यू शॉर्ट, लियाम लिविंगस्टन, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), शाहरुख खान, सॅम करन, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग
गुजरात टायटन्स :
वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक), शुभमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पंड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहम्मद शमी, जोशुआ लिटल, यश दयाल, अल्झारी जोसेफ
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.