DC VS MI Match Highlights: आयपीएल २०२३ स्पर्धेतील १६ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने जोरदार कामगिरी करत दिल्ली कॅपिटल्स संघावर ६ गडी राखून विजय मिळवला आहे.
यासह मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल २०२३ स्पर्धेत विजयाचं खातं उघडलं आहे. या सामन्यात रोहित शर्माने तूफानी अर्धशतकी खेळी केली. मात्र रोहित शर्मा पेक्षा जास्त चर्चा ही उर्वशी रौतेलाची झाली. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने निऑन ग्रीन रंगाचा टॉप परिधान केला आहे. तिने मंगळवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात झालेला सामना पाहण्यासाठी दिल्लीच्या अरुण जेठली स्टेडियममध्ये हजेरी लावली होती. तिने हा व्हिडिओ शेअर करताच, नेटकऱ्यांनी तिला रिषभ पंतच्या नावाने ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
एका युझरने उर्वशीच्या फोटोवर कमेंट करत म्हटले की, 'आज रिषभ पंत नाहीये...' तर दुसऱ्या एका युझरने कमेंट करत म्हटले की,'दिल्लीच्या पराभवाचं कारण आता समोर आलं..' तर आणखी एका युझरने कमेंट करत म्हटले की, 'उर्वशी ही मुंबई इंडियन्स संघाची इम्पॅक्ट प्लेअर आहे,' उर्वशी रौतेला ही नेहमीच रिषभ पंतमुळे चर्चेत येत असते. यावेळी रिषभ पंत नसतानाही ती चर्चेत आली आहे.
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दिल्ली कॅपिटल्स संघाकडून फलंदाजी करताना अक्षर पटेलने सर्वाधिक ५४ धावांची खेळी केली.
तर डेव्हिड वॉर्नरने ५१ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्स संघाने २० षटक अखेर १७२ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना रोहित शर्माने सर्वाधिक ६५ तर टिळक वर्माने ४१ धावांची खेळी करत हा सामना मुंबई इंडियन्स संघाला ६ गडी राखून जिंकून दिला. (Latest sports updates)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.