

प्रफुल्ल हिंगेचा IPL 2026 मध्ये दमदार डेब्यू
पहिल्याच सामन्यात शानदार गोलंदाजी
राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजीचा केला धुव्वा
आयपीएल २०२६मध्ये आज एका नव्या ताऱ्याचा उदय झाला आहे.सनरायझर्स हैदराबादचा युवा गोलंदाज प्रफुल्ल हिंगे याने आपल्या पहिल्याच सामन्यातील कामगिरीमुळे सर्वांची वा वा मिळवली आहे. ज्या फलंदाजीच्या जोरावर राजस्थाननं अनेक संघाच्या तोंडाचं पाणी पळवलं होतं, त्याच फलंदाजीला प्रफुल्ल हिंगे याने अवघ्या ६ चेंडूत उद्धवस्त केलंय.
राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर वैभव सूर्यवंशी याच्याकडून चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र प्रफुल्ल हिंगेने वैभवला शून्यावर झेलबाद केलं. सलील अरोराने वैभवचा झेल टिपला. वैभवसारख्या आक्रमक फलंदाजाला पहिल्याच चेंडूवर बाद केल्यानंतर प्रफुल्लने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. वैभवनंतर पहिल्याच षटकात यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेललाही शून्यावर क्लिन बोल्ड केलं.
अवघी एक धाव देत त्याने २ विकेट्स घेतल्या. आयपीएल कारकिर्दीतील पहिलेच षटक टाकण्यासाठी आलेल्या प्रफुल्लने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्याने आपल्या पहिल्या षटकात तब्बल ३ फलंदाजांना बाद केले आयपीएल पदार्पणाच्या पहिल्याच षटकात ३ बळी घेणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे.
प्रफुल्ल हिंगे हा विदर्भाचा २४ वर्षीय युवा गोलंदाज आहे. नागपूरमध्ये १८ जानेवारी २००२ रोजी जन्मलेल्या प्रफुल्लला वयाच्या १३ वर्षापासून क्रिकेटची आवड आहे. विदर्भाकडून स्थानिक क्रिकेट खेळणाऱ्या या गोलंदाजाने आपल्या कामगिरीच्या जोरावर आयपीएल फ्रँचायझींचं लक्ष वेधून घेतले आहे. प्रफुल्ल हिंगे हा नागपूरचा रहिवासी आहे.
तो विदर्भ संघाकडून खेळतो. सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याला आयपीएल लिलावापूर्वी सनरायझर्स हैदराबाद, मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या संघांनी ट्रायलसाठी बोलावलं होतं. त्याच्या गोलंदाजीतील विविधता आणि नियंत्रण पाहून सनरायझर्स हैदराबादने त्याला आपल्या संघात घेतलं. प्रफुल्लने आतापर्यंत १० फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये २७ विकेट्स घेतल्या आहेत. त्याची सरासरी २६.६६ इतकी आहे. तो विदर्भाच्या विजय हजारे ट्रॉफी जिंकणाऱ्या संघामधील खेळाडू होता. या स्पर्धेत त्याने ५ सामन्यांमध्ये ५ विकेट्स घेतल्या होत्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.