IND vs SA: कधी थांबणार गौतम गंभीरचे प्रयोग? सूर्या-गिल आजतरी फॉर्ममध्ये येणार आहे?

IND vs SA 3rd T20I: भारतीय संघाचे मार्गदर्शक गौतम गंभीर यांनी अलीकडील सामन्यांमध्ये संघरचनेत अनेक प्रयोग केले आहेत. या प्रयोगांमुळे काही खेळाडूंना संधी मिळाली असली तरी संघाच्या सातत्यपूर्ण कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
IND vs SA 3rd T20I
IND vs SA 3rd T20Isaam tv
Published On

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्याच सध्या पाच टी-20 सामन्यांची सिरीज सुरु आहे. यामध्ये सिरीजमधील दुसरा सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकूला असून यानंतर धर्मशालामध्ये होणारा सामना सिरीजसाठी निर्णायक ठरणार आहे. सामन्याच्या आधीच्या दिवशी म्हणजेच शनिवारी हवामानात झालेल्या बदलामुळे रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे.

गंभीरचे प्रयोग ठरतायत फेल

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने गेल्या सामन्यात अक्षर पटेलला तिसऱ्या क्रमांकावर पाठवलं होतं. मात्र त्याचा हा प्रयोग अपयशी ठरला. प्रशिक्षक म्हणून गंभीर केकेआरपासून भारतीय टीमपर्यंत प्रयोग करतोय. त्याचे काही प्रयोग यशस्वी ठरलेत. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यात गंभीर काय प्रयोग करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

टीम इंडिया शुक्रवारीच धर्मशाला पोहोचली असून शनिवारी खेळाडूंनी स्टेडियममध्ये फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाचा सराव केला. तर दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी मॅक्लोडगंजमध्ये फिरण्याला प्राधान्य दिले.

सूर्यकुमार आणि गिलकडून मोठ्या खेळीची अपेक्षा

कर्णधार सूर्यकुमार यादव आणि उपकर्णधार शुभमन गिल यांचा खराब फॉर्म मोठ्या चिंतेचा विषय आहे. सूर्यकुमारने यंदाच्या वेळी अजून एकही अर्धशतक केलेलं नाही. गिललाही या सिरीजमध्ये मोठी खेळी करता आलेली नाही. शुभमनने शेवटचं अर्धशतक 13 जुलै 2024 रोजी हरारेमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध केलं होतं. गिलला अजित अगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीचा निर्णय योग्य ठरवण्यासाठी त्याला मोठी कामगिरी करावी लागेल.

IND vs SA 3rd T20I
IPL 2025: ...तर रोहित-सूर्यकुमार MI सोडून जाऊच शकत नाहीत; आयपीएलपूर्वी BCCI घेणार मोठा निर्णय?

सिरीजमध्ये आघाडी घेणं गरजेचं

पाच सामन्यांच्या सिरीजमध्ये आघाडी मिळवण्यासाठी भारताला धर्मशालामध्ये विजय मिळवणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु गेल्या सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजीतील कामगिरी काहीशी चिंताजनक आहे. वारंवार केले जाणारे प्रयोगही टीमवर परिणाम करतायत. चंदीगडमध्ये खेळलेल्या सामन्यात अक्षर पटेलला तिसऱ्या क्रमांकावर आणि शिवमला आठव्या क्रमांकावर पाठवण्यात आलं होतं. शिवम मैदानात आला तेव्हा सामना हातातून निसटला होता.

IND vs SA 3rd T20I
Suryakumar Yadav: चॅम्पियन्स ट्रॉफीआधी श्रेयस अय्यर संघातून बाहेर! सूर्यकुमार यादवला मिळाली संधी

धर्मशालामध्ये कसा आहे रेकॉर्ड?

या स्टेडियममधील रेकॉर्ड पाहिला तर 10 वर्षांपूर्वी 2 ऑक्टोबर 2015 रोजी खेळलेल्या एकमेव सामन्यात दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला होता. त्या सामन्यात भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माने शतक ठोकलं होतं. त्यानंतर 15 सप्टेंबर 2019 रोजी दक्षिण आफ्रिका धर्मशालामध्ये भारताविरुद्ध टी-20 सामना खेळण्यासाठी आला होता, पण तो सामना पावसामुळे रद्द झाला.

IND vs SA 3rd T20I
IND vs SA: कसं आहे बाराबाती स्टेडियमचं पिच? सामन्यापूर्वी सूर्यकुमार यादवने केला मोठा खुलासा

हवामान आणि पिचचा अंदाज

शनिवारी धर्मशालामध्ये कमाल तापमान 12 अंश सेल्सियस आणि किमान तापमान सात अंश सेल्सियस नोंदवलं गेलं. रविवारीही कमाल तापमान 13 अंश सेल्सियस आणि किमान तापमान सात अंश सेल्सियस राहण्याचा अंदाज आहे. आकाशात काळे आणि दाट ढग रविवारीही पसरलेले असतील. या मैदानाचं पीच वेगवान गोलंदाज आणि फलंदाजांसाठी फायदेशीर आहे.

IND vs SA 3rd T20I
Ind Vs Sa: अंपायरच्या चुकीमुळे दक्षिण आफ्रिकेचा पराभव, बुमराहच्या 'त्या' कृत्याकडे दुर्लक्ष? पाहा Video

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com