

मंगळवारी भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये पहिला टी-२० सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात भारताने १०१ रन्सने विजय मिळवून दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या सिरीजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली. दरम्यान हा सामना टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसाठी फार खास ठरला.
या सामन्यात जसप्रीत बुमराहने टी-२० फॉर्मेटमधील 100वी विकेट घेतली. भारताच्या विजयामध्ये जसप्रीत बुमराहच्या विकेट्सची मोलाची भूमिका होती . मात्र सर्वात चर्चेत राहिलेला क्षण म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डेवाल्ड ब्रेविसची विकेट.
ही घटना 11व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर घडली. जसप्रीत बुमराहने ऑफ स्टंपवर वेगवान बॉल टाकला ज्याला ब्रेविसने हवेत खेळण्याचा प्रयत्न केला. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने एक्स्ट्रा कव्हरवर तो कॅच सहज पकडला. मात्र अंपायरने निर्णय देण्यापूर्वी थर्ड अंपायरचा सल्ला घेतला.
रीप्लेमध्ये असं दिसून आलं की, बुमराहने क्रीज थोडी ओलांडली असल्यामुळे चेंडू नो-बॉल ठरू शकतो. पण थर्ड अंपायरने बॉल वैध मानला आणि ब्रेविसला आउट दिलं. त्यावेळी ब्रेविसने 14 बॉल्समध्ये 22 रन्स केले होते. ज्यामध्ये तीन चौकार आणि एक सिक्सचा समावेश होता. या विकेटसह बुमराहने टी20 मध्ये आपले 100 विकेट्स पूर्ण केले.
जसप्रीत बुमराहच्या या विक्रमासह तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तीनही फॉर्मेटमध्ये 100 विकेट्स घेणारा पाचवा गोलंदाज ठरला. यापूर्वी शाकिब अल हसन, टिम साउदी, लसिथ मलिंगा आणि शाहीन आफ्रिदी यांनी ही कामगिरी केली होती.
टॉस गमावल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी करताना 175 रन्स केले. खरं म्हणजे हे पिच फलंदाजीसाठी सोपं नव्हतं. हार्दिक पंड्याने 28 चेंडूत 59 रन्सची तुफानी खेळी केली. ज्यामध्ये ज्यात सहा चौकार आणि चार सिक्सेसचा सममावेश होता. अभिषेक शर्मा (17), तिलक वर्मा (26) आणि अक्षर पटेल (23) रन्स करून आऊट झाले. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडीने 31 रन्स देऊन 3 विकेट्स घेतले.
176 रन्सचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेची टीम 12.3 ओव्हर्समध्ये फक्त 74 रन्सवर सर्वबाद झाला. हा त्यांचा टी20 मधील सर्वात कमी स्कोर ठरला. यापूर्वी त्यांनी 2022 मध्ये राजकोटमध्ये 87 रन्स केले. भारताकडून जसप्रीत बुमराहने 17 रन्स देत 2 विकेट्स घेतले. अर्शदीप सिंह आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.