

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील पहिला टी-20 सामना 9 डिसेंबर रोजी कटकच्या बाराबती स्टेडियमवर खेळला जाणार आहे. आगामी टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या दृष्टीने ही सिरीज भारतीय टीमसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या पाच सामन्यांनंतर भारताला न्यूझीलंडविरुद्धही पाच टी-20 सामने खेळायचे आहेत. त्यामुळे टीम इंडिया या सिरीजद्वारे वर्ल्ड कपसाठीची तयारी करणार आहे.
सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने बाराबती स्टेडियमच्या पिचबाबत मोठा खुलासा केला. सूर्या म्हणाला, "या ठिकाणचं पिच लाल मातीचं बनलंय. मी पहिल्यांदाच असं पिच पाहतोय. मला अजून पिचजवळ जाण्याची संधी मिळालेली नाही. पण मला वाटतं की, ते चांगलं असेल. काळी माती अधिक चांगली असते, पण लाल मातीच्या पिचवरही चांगला खेळ होईल असं वाटतंय. जर पिच वेगवान असेल तर ते आमच्यासाठी फायदेशीर ठरेल."
कटकमध्ये आतापर्यंत हाय-स्कोरिंग सामने फारसे झालेले नाहीत. या मैदानावर एकूण 3 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. शेवटचा सामना जून 2022 मध्ये झाला होता. भारताने या ठिकाणी खेळलेल्या 3 सामन्यांपैकी फक्त 1 सामन्यात विजय मिळवला होता तर 2 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.
या पिचवर स्पिनर्सपेक्षा वेगवान गोलंदाजांचा प्रभाव अधिक दिसतो. संध्याकाळी दव पडल्यामुळे फलंदाजी सोपी होते आणि दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या टीमला फायदा मिळतो.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये आतापर्यंत एकूण 30 टी-20 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी भारताने 18 सामन्यांत विजय मिळवला आहे, तर दक्षिण आफ्रिकेने 12 सामने जिंकले आहेत. आता या सिरीजमध्ये टीम इंडिया कशी कामगिरी करते हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. याआधी खेळलेल्या वनडे सिरीजमध्ये भारताने 2-1 असा विजय मिळवला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.