MS Dhoni: जेव्हा धोनीने रागात स्क्रीन फोडली.. हरभजन सिंगने सांगितला तो किस्सा

Harbhajan Singh On MS Dhoni: भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने एमएस धोनीचा एक किस्सा सांगितला आहे.
MS Dhoni: जेव्हा धोनीने रागात स्क्रीन फोडली.. हरभजन सिंगने सांगितला तो किस्सा
harbhajan singh with ms dhoni yandex
Published On

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी आपल्या शांत स्वभावासाठी ओळखला जायचा. त्यामुळे त्याला कॅप्टन कुल म्हणून असंही म्हटलं जायचं. मात्र काही वेळेस तो क्रिकेटच्या मैदानावर संताप व्यक्त करतानाही दिसून आला आहे.

आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यात तो थेट लाईव्ह सामन्यात मैदानात आला अंपायरसोबत वाद घालताना दिसून आला होता. दरम्यान आता भारताचा माजी गोलंदाज हरभजन सिंगने एमएस धोनी बाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे.

धोनीने रागात स्क्रीन तोडली

आयपीएल २०२४ स्पर्धेतील एलिमिनेटरचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने शानदार विजय मिळवला होता. दरम्यान मैदानाबाहेर गेल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये जात असताना त्याने रागात स्क्रीनला बुक्कीने मारत स्क्रीन फोडली होती.

MS Dhoni: जेव्हा धोनीने रागात स्क्रीन फोडली.. हरभजन सिंगने सांगितला तो किस्सा
IND vs BAN: अडीच दिवस अन् 52 षटकात जिंकली मॅच! काय होता रोहितचा 'मास्टरप्लान'?

भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने याबाबत खुलासा केला आहे. स्टार स्पोर्ट्सवर बोलताना हरभजन सिंग म्हणाला की, ' आरसीबीचा संघ विजयाचा जल्लोष साजरा करत होता. त्यावेळी चेन्नईचा संघ हाथ मिळवणी करण्यासाठी थांबला होता. मात्र आरसीबीच्या खेळाडूंना हात मिळवणी करायला उशीर झाला. त्यामुळे धोनी हात न मिळवताच माघारी परतला होताय. त्यावेळी धोनीने रागात स्क्रीनवर बुक्की मारली आणि स्क्रीन फोडली होती. '

MS Dhoni: जेव्हा धोनीने रागात स्क्रीन फोडली.. हरभजन सिंगने सांगितला तो किस्सा
Irani Cup 2024: इराणी कप सुरु असतानाच स्टार खेळाडू रुग्णालयात भरती! नेमकं काय घडलं?

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर आरसीबीने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ५ गडी बाद २१८ धावा केल्या होत्या. चेन्नईला हा सामना जिंकण्यासाठी २१९ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना चेन्नईला अवघ्या १९१ धावा करता आल्या. या सामन्यात धोनीने १३ चेंडूंचा सामना करत २५ धावांची खेळी केली होती. मात्र तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नव्हता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com