Shardul Thakur News In Marathi: लखनऊच्या इकाना स्टेडियमवर मुंबई आणि रेस्ट ऑफ इंडिया या दोन्ही संघांमध्ये इराणी कपचा सामना सुरु आहे. या सामन्यात मुंबईकर सरफराज खानची हवा पाहायला मिळाली आहे. सरफराजने पहिल्या डावात फलंदाजी करताना दुहेरी शतकी खेळी केली. या खेळीच्या बळावर मुंबईने ५०० धावांचा पल्ला गाठला. दरम्यान हा सामना सुरु असताना स्टार खेळाडूला रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. काय आहे प्रकरण? जाणून घ्या.
इराणी कपला १ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. स्पर्धेतील पहिल्या दिवसापासूनच शार्दुल ठाकुरची प्रकृती स्थिर नव्हती. त्याला ताप आला होता. सामन्यातील दुसऱ्या दिवशी त्याने सरफराज खानसोबत मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली. त्याने व्या विकेटसाठी ७३ धावा जोडल्या. यादरम्यान त्याचा ताप आणखी वाढला. त्यामुळे त्याला रुग्णालयात भरती करण्यात आलं.
एका सुत्राने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीत म्हटले की, 'पूर्ण दिवस तो ठिक नव्हता. त्याला ताप होता. हेच कारण होतं की, तो उशिराने फलंदाजी करायला आला. त्या कमजोरी आली होती. त्यामुळे त्याने औषध घेतलं आणि तो ड्रेसिंग रुममध्ये जाऊन झोपला. काही वेळ विश्रांती केल्यानंतर त्याला पुन्हा फलंदाजीला यायचं होतं. आम्ही त्याची डेंग्यु आणि मलेरियाची चाचणी केली आहे. आम्ही रिपोर्ट येण्याची वाट पाहतोय.
शार्दुल ठाकुरला ताप होता. मात्र तरीही तो मैदानात उतरला. गेल्या हंगामातही त्याला रणजी ट्रॉफी सुरु असताना तो दुखापतग्रस्त झाला होता. असं असतानाही तो मैदानात उतरला होता. मात्र यावर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या सुरुवातीला तो दुखापतग्रस्त झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.