
चॅम्पियन ट्रॉफीमध्ये विराट कोहली चांगली कामगिरी करत आहे. विराट कोहलीने पाकिस्तानविरोधात शतकी खेळी खेळली. सेमीफायनलच्या सामन्यातही विराट कोहलीने अर्धशतकीय खेळी खेळली. आता विराट कोहली फायनलमध्ये न्यूझीलंडच्या विरोधात खेळण्यास सज्ज झाला आहे. फायनलमध्ये विराट कोहली माजी कर्णधार सौरव गांगुलीचा रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे. विराट कोहली ५ धावा दूर आहे.
विराट कोहलीने आतापर्यंत वनडे करिअरमध्ये दोनदा विश्वचषक आणि २ वेळा चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत खेळला आहे. विराट वनडे विश्वचषक २०११ आणि २०२३ फायलन आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये २०१३ आणि २०१७ फायनलमध्येही खेळला आहे. या सर्व सामन्यात वनडे करिअरमध्ये ४ आयसीसी फायनल सामन्यात ३४.२५ च्या सरासरीने १३७ धावा कुटल्या आहेत. तर यातील एका सामन्यात विराट कोहलीने अर्धशतकही ठोकलं आहे.
विराट कोहलीने भारताकडून आयसीसी वनडे फायनलमध्ये सर्वाधिक धावा करणारा पहिल्या क्रमाकांवरील खेळाडू हा विराट कोहली आहे. या रेकॉर्डच्या क्रमवारीत सौरव गांगुली पहिल्या स्थानावर आहे. सौरव गांगुलीने ४ आयसीसी वनडे फायनलमध्ये १४१ धावा कुटल्या आहेत. त्यामुळे विराट कोहली हा सौरव गांगुलीचा रेकॉर्ड मोडण्यासाठी फक्त ५ धावा दूर आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये विराट कोहलीने पहिल्या सामन्यात २२ आणि पाकिस्तानच्या विरोधात १०० धावांची नाबाद खेळी खेळली. या व्यतिरिक्त न्युझीलंडविरोधात ११ आणि ऑस्ट्रेलियाच्या विरोधात ८४ धावांची खेळी खेळली.
सौरव गांगुली - १४१ धावा
विराट कोहली - १३७ धावा
वीरेंद्र सहवाग - १२० धावा
सचिन तेंडुलकर - ९८ धावा
गौतम गंभीर - ९७ धावा
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.