
भारतीय संघ जेव्हा जेव्हा अडचणीत असतो, तेव्हा विराट कोहली ढाल बनून उभा राहतो. असं एकदा दोनदा नाही, तर गेल्या दीड दशकात अनेकदा घडलंय. धावांचा पाठलाग करण्यात विराट कोहलीने पीएचडी केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातही धावांचा पाठलाग करताना विराटने शानदार खेळी सजवली. यादरम्यान त्याच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील सेमीफायनलचा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात आला. भारताच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण डाव २६४ धावांवर संपुष्ठात आणला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला हवी तशी सुरुवात करता आली नव्हती. रोहित शर्मा आणि शुभमन गिल स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर संपूर्ण जबाबदारी चेजमास्टर विराट कोहलीवर होती.
जेव्हा विषय गंभीर असतो, तेव्हा विराट खंबीरपणे उभा राहतो. या सामन्यातही त्याने एकेरी- दुहेरी धावा घेत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यादरम्यान त्याने आयसीसीच्या नॉकआऊटमध्ये १००० धावा पूर्ण केल्या आहेत. यापूर्वी असा रेकॉर्ड कुठल्याही फलंदाजाला करता आला नव्हता. आयसीसीच्या नॉकआऊटमध्ये भारतीय संघ अडचणीत असताना नेहमीच विराटने महत्वपूर्ण खेळी केली आहे.
या सामन्यात फलंदाजीला येण्यापूर्वीच विराट कोहलीने मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. विराट हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल पकडणारा भारतीय क्षेत्ररक्षक ठरला आहे. विराटने आतापर्यंत एकूण ३३५ झेल घेतले आहेत.
विराटने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ५४९ व्या सामन्यात हा कारनामा करुन दाखवला आहे. या रेकॉर्डमध्ये त्याने राहुल द्रविडला मागे सोडलं आहे. राहुल द्रविडच्या नावे ३३४ झेल टीपण्याची नोंद आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.