Virat Kohli Dance: भारताची डोकेदुखी गेली! हेड बाद होताच विराट कोहलीचा मैदानावरच जबरदस्त डान्स -VIDEO

Virat Kohli Dance After Travis Head Wicket: ट्रेविस हेड भारतीय गोलंदाजांना नेहमीच नडतो. मात्र यावेळी तो स्वस्तात माघारी परतला. दरम्यान हेड बाद झाल्यानंतर विराट कोहली मैदानावरच डान्स करताना दिसून आला.
Virat Kohli Dance: भारताची डोकेदुखी गेली! हेड बाद होताच विराट कोहलीचा मैदानावरच जबरदस्त डान्स -VIDEO
virat kohlitwitter
Published On

Virat Kohli Dance Video: भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ जेव्हा आमनेसामने येतात तेव्ह एक खेळाडू सर्वात मोठा डोकेदुखी ठरतो, तो म्हणजे डावखुऱ्या हाताचा फलंदाज ट्रेविस हेड. आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील फायनल,आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेची फायनल आणि त्यानंतर बॉर्डर -गावसकर मालिका या तिन्ही मोठ्या स्पर्धांमध्ये एकटा ट्रेविस हेड भारतीय संघावर भारी पडला होता.

त्यामुळे यावेळीही हेड भारतीय गोलंदाजांवर भारी पडणार का? असं वाटलं होतं. मात्र वरुणच्या फिरकीसमोर हेडची जादू कामी आली नाही.

Virat Kohli Dance: भारताची डोकेदुखी गेली! हेड बाद होताच विराट कोहलीचा मैदानावरच जबरदस्त डान्स -VIDEO
Ind vs Aus : ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, पण सेमीफायनल जिंकणार कोण? अंदाज आला समोर

वरुणच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला हेड

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील सेमीफायनलच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी कॉनली आणि हेड ही जोडी मैदानावर आली. कॉनलीला बाद करत भारताने ऑस्ट्रेलियाला पहिला मोठा धक्का दिला. त्यानंतर हेडला लवकरात लवकर बाद करणं हे भारतीय गोलंदाजांसमोर असलेलं सर्वात मोठं आव्हान होतं.

Virat Kohli Dance: भारताची डोकेदुखी गेली! हेड बाद होताच विराट कोहलीचा मैदानावरच जबरदस्त डान्स -VIDEO
Champions Trophy 2025 : रोहित सेना काळी पट्टी बांधून का उरतलीये मैदानात? हे आहे खरं कारण

तर झाले असे की भारतीय संघाची गोलंदाजी सुरु असताना ९ वे षटक टाकण्यासाठी वरुण चक्रवर्ती गोलंदाजीला आला. वरुण चक्रवर्ती सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. त्याने भल्याभल्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवलं आहे.

दरम्यान या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर हेडने स्टेपआऊट होऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र लाँग ऑफला क्षेत्ररक्षण करत असलेल्या गिलने धावत येऊन शानदार झेल घेतला. यासह ऑस्ट्रेलियाला दुसरा मोठा धक्का बसला.

विराट कोहलीचा भन्नाट डान्स

हेडचा विकेट घेणं किती महत्वाचं होतं, हे १४० कोटी भारतीयांना चांगलच माहीत होतं. कारण हेड जर टीकला असता तर त्याने भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारुन दिली असती. मात्र वरुण चक्रवर्तीने त्याला स्वस्तात बाद करत माघारी धाडलं. हेड बाद झाल्यानंतर विराट कोहली मैदानावरच भांगडा डान्स करताना दिसून आला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com