Axar Patel- Virat Kohli: लाईव्ह सामन्यात विराट अक्षरच्या पाया पडला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Virat Kohli Touch Feet Of Axar Patel: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सामन्यात विराट कोहली अक्षर पटेलच्या पाया पडताना दिसून आला. ज्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.
Axar Patel- Virat Kohli: लाईव्ह सामन्यात विराट अक्षरच्या पाया पडला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
axar pateltwitter
Published On

भारतीय संघातील अनुभवी फलंदाज विराट कोहलीसाठी रविवारचा दिवस अतिशय महत्वाचा होता. विराट आपल्या वनडे कारकिर्दीतील ३०० वा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. असा कारनामा करणारा तो सातवा भारतीय ठरला. या सामन्यात विराटला फलंदाजीत हवी तशी कामगिरी करता आली नाही.

ग्लेन फिलिप्सने घेतलेल्या शानदार झेलमुळे विराटचा डाव लवकर आटोपला. त्यानंतर क्षेत्ररक्षण करताना विराट प्रचंड अॅक्टीव्ह दिसून आला. दरम्यान सामना सुरु असताना तो अक्षर पटेलच्या पाया पडताना दिसून आला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Axar Patel- Virat Kohli: लाईव्ह सामन्यात विराट अक्षरच्या पाया पडला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
IND vs AUS Record: भारत- ऑस्ट्रेलिया सेमीफायनलमध्ये भिडणार? कसा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड?

भारतीय संघात अक्षर पटेलला बापू म्हणतात. फलंदाजी असो, गोलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण असो तिन्ही क्षेत्रात तो दमदार कामगिरी करताना दिसून येत असतो. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यातही आधी त्याने फलंदाजीत बहुमूल्य योगदान दिलं. त्यानंतर गोलंदाजीत त्याने महत्वपूर्ण अशी केन विलियम्सनची विकेट मिळवून दिली.

हा विकेट भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा होता. कारण विलियम्सन टीकला असता, तर हा सामना भारतीय संघाच्या हातून निसटला असता. त्यामुळे या विकेटनंतर भारतीय खेळाडू जोरदार जल्लोष करताना दिसून आले. विराटने तर अक्षरचे पायच धरले.

Axar Patel- Virat Kohli: लाईव्ह सामन्यात विराट अक्षरच्या पाया पडला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
IND vs AUS: १४० कोटी भारतीयांच्या मनात अजूनही ती सल.. रोहितसेना कांगारुंचा वचपा काढणार?

तर झाले असे की, केन विलियम्सनची शतकाच्या दिशेने वाटचाल सुरु होती. त्यावेळी रोहितने अक्षर पटेलला गोलंदाजीसाठी बोलावलं. अक्षरच्या गोलंदाजीवर विलियम्सनने स्टेपआऊट होऊन मारण्याचा प्रयत्न केला.

मात्र त्याचा हा प्रयत्न फसला. कारण केएल राहुलने त्याला स्टम्पिंग करत माघारी धाडलं. विलियम्सनच्या विकेटनंतर भारतीय संघाने सामन्यात कमबॅक केलं. त्यामुळे भारतीय खेळाडूंचा एकच जल्लोष पाहायला मिळाला. विराट कोहली धावत अक्षरकडे गेला आणि त्याचे पाय धरण्याचा प्रयत्न करु लागला. मात्र अक्षरने त्याला थांबवलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

भारताचा शानदार विजय

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाला २४९ धावा करता आल्या. भारताकडून श्रेयस अय्यरने शानदार अर्धशतकी खेळी केली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंड संघाचा डाव २०५ धावांवर आटोपला. भारताने हा सामना ४४ धावांनी आपल्या नावावर केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com