Pakistan Pakhtunkhwa Terrorists Attack: रमजानचा उपवास सोडत असताना दहशतवादी हल्ला; १२ ठार, ३० जण जखमी| Video Viral

Terrorists Attack In Pakistan Khyber Pakhtunkhwa : पाकिस्तानच्या उत्तर पश्चिम भागातील खैबर पख्तूनख्वा या प्रांतात दहशतवादी हल्ला झाला असून यात तीन लहान मुलांसह १२ जण ठार झालेत.
Terrorists Attack In  Pakistan
Terrorists Attack In Pakistan Khyber Pakhtunkhwasaam tv
Published On

पाकिस्तानातमधधील खैबर पख्तूनख्वा प्रांतात दहशतवादी हल्ला झालाय. पख्तूनख्वा प्रांतात दोन बॉम्बस्फोट हल्ला झाल्याची माहिती मिळतेय. या घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला तर ३० जण ठार झाले. हा पूर्वनियोजित दहशतवादी हल्ला होता, अशी माहिती समोर आलीय. एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार या हल्ल्यानंतर सुरक्षा दल आणि हल्लेखोर यांच्यात चकमकही देखील झालीय. या दहशतवादी हल्ल्यामागे जैश उल फुरसान या दहशतवादी संघटनेचा हात असल्याची चर्चा आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी दोन कार बॉम्बचा उपयोग या ठिकाणी केला. सुरक्षा दलांचं लक्ष विचलित करण्यासाठी हा हल्ला केला. त्यानंतर लक्ष्यपूर्वक हल्ला केला. दहशतवाद्यांनी इफ्तारनंतर बन्नू केंट या ठिकाणी सुरक्षा कड्यावर हल्ला केला. हल्ला करणारे सहा ते सात दहशतवादी होते अशीही माहिती हाती आलीय.

Terrorists Attack In  Pakistan
Ram Mandir Attack Plot Probe: अयोध्येतील राम मंदिरावर दहशतवादी हल्ल्याचा कट; संशयिताला अटक, हँड ग्रेनेड जप्त

१२ जणांमध्ये तीन लहान मुलांचाही समावेश

पाकिस्तानच्या उत्तर पश्चिम भागातील खैबर पख्तूनख्वा या प्रांतात दहशतवादी हल्ला झाला असून यात तीन लहान मुलांसह १२ जण ठार झालेत. तर ३० हून अधिक लोक जखमी झालेत. रमजानचा उपवास सोडत असतानाचा हा हल्ला झाला त्यामुळे खळबळ उडाली. या ठिकाणी आक्रोश आणि किंकाळ्या ऐकू येत होत्या. तसेच धुराचे आणि धुळीचे लोटही मोठ्या प्रमाणावर उठले होते.

Terrorists Attack In  Pakistan
Fire In Japan : भीषण अग्नितांडव! ८० हून अधिक इमारती जळून खाक, हजारो लोकांनी घर सोडलं

या हल्लाप्रकरणी एका पोलीस अधिकाऱ्याने की, दहशतवाद्यांनी जे स्फोट घडवून आणले त्यामुळे चार फुटांचे दोन खड्डे त्या ठिकाणी झाले. तसेच आठ घरांची पडझड झाली. पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनीही या हल्ल्याचा निषेध नोंदवलाय. याआधी सोमवारी पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात एका महिला सुसाइड बॉम्बरने हल्ला केला होता. पॅरामिलिट्री फ्रंटियर कोअरवर हा हल्ला झाला होता. या हल्ल्यात एका सैनिकाचा मृत्यू झाला. त्यानंतर आता खैबर पख्तूनख्वा या ठिकाणी हल्ला करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com