Virat Kohli Record : म्हणून त्याला 'किंग' कोहली म्हणतात! विराटनं मोडला विक्रमादित्य सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम

virat kohli breaks sachin tendulkar world record : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत ७४ धावांची तुफानी खेळी करून महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम मोडीत काढला.
विराट कोहलीनं मोडला सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम
विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. saam tv
Published On: 

माझे विक्रम भारताचे दोन स्टार फलंदाज मोडू शकतील, ते दोघे म्हणजे रोहित शर्मा आणि विराट कोहली.... असं साधारण दशकभरापूर्वी स्वतः महान फलंदाज सचिन तेंडुलकर म्हणाला होता. ते आता काही अंशी खरं ठरतंय. कारण भारताचा रनमशीन, चेजमास्टर विराट कोहलीनं सचिनचा एक विश्वविक्रम मोडलाय. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात तुफानी खेळीनंतर सचिनचा हा विक्रम विराटनं मोडीत काढून यशोशिखर सर केलंय.

टी २० आणि त्यानंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालेला विराट कोहली सध्या फक्त वनडे क्रिकेट आणि आयपीएल स्पर्धेत खेळतोय. पण त्याच्या फॉर्ममध्ये काहीच फरक पडला नाही. मैदानात आल्यानंतर तोच जोश, तोच आक्रमक बाणा आणि फलंदाजी तर त्याहून कडक...विराट आता वनडे संघातूनही बाहेर होईल असं फुकाचं भाकित वर्तवणाऱ्या क्रिकेट पंडितांनाही त्यानं बॅटनं चोख प्रत्युत्तर दिलंय. आपण अजूनही रनमशीन आणि चेजमास्टर आहोत हे त्यानं दाखवून दिलंय.

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात त्यानं यशाचा आणखी एक टप्पा गाठला आहे. याआधी हा विक्रम मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिननं हा विक्रम मोडलाय. वनडे क्रिकेटमध्ये चेज करताना सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून विराटनं वर्ल्ड रेकॉर्ड केलाय.

न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेत कोहलीने ७४ धावांची तुफानी खेळी केली. वनडेत धावांचा पाठलाग करताना त्याच्या ८७४१ धावा झाल्या. याबाबत त्यानं सचिन तेंडुलकरनं मागे टाकलं. सचिनच्या नावावर ८७२० धावा आहेत. आता कोहली वनडेमध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरलाय.

विराट कोहलीनं मोडला सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम
Hardik Pandya: ठरलं! हार्दिक पंड्या दुसऱ्या टीममध्ये जाणार, मुंबई इंडियन्सला मिळणार 2 खेळाडू, ट्रेडबाबत मोठी अपडेट

विराटने १८० सामन्यांतील १६९ डावांत ८७४१ धावा केल्या आहेत. तर सचिनने २४२ सामन्यांतील २३२ डावांत ८७२० धावा केल्या होत्या. धावांच्या सरासरीच्या बाबतीत विराट हा सचिनच्या बराच पुढे आहे. धावांचा पाठलाग करताना कोहलीच्या धावांची सरासरी ६६.२१ आहे. तर सचिनने ४२.३३ च्या सरासरीने या धावा केल्या आहेत. कोहलीने यावेळी ३० शतके आणि ४६ अर्धशतके ठोकली आहेत. तर सचिनच्या नावावर या दरम्यान १७ शतके आणि ५२ अर्धशतके आहेत. कोहलीचा स्ट्राइक रेट ९५ पेक्षा जास्त, तर सचिनचा स्ट्राइक रेट ८८ पेक्षा अधिक आहे.

विराट कोहलीनं मोडला सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम
Ind vs NZ Highlights : पावसाचा अडथळा आणि किंग कोहलीचं तुफान...भारतानं पहिल्याच वनडेत न्यूझीलंडला लोळवलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.