India vs Pakistan: अंडर-19 आशिया कपमध्ये पाकिस्तानकडून भारताचा पराभव; अर्जुन राजपूतचं शतक ठरलं व्यर्थ

India Pakistan Match: अंडर-19 आशिया कप 2026 मध्ये पाकिस्तानने भारताचा 3 विकेट्सने पराभव केला. अर्जुन राजपूतने 107 धावांची खेळी केली, मात्र हमजा जहूरच्या नाबाद शतकामुळे पाकिस्तानने 49 व्या षटकात विजय मिळवला. ओमानमध्ये रंगलेल्या या सामन्यात दोन्ही संघांच्या फलंदाजांनी शतके झळकावली.
India vs Pakistan
India vs Pakistansaam tv
Published On: 

अंडर-19 आशिया कप 2026 स्पर्धेत टीम इंडियाला पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला. ओमानमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा सामना चांगलाच रंगला. कमी धावसंख्या असलेल्या या सामन्यात दोन्ही टीम्सच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली.

पण कठीण परिस्थितीत दोन्ही टीम्सच्या एका-एका फलंदाजाने शतकी खेळी केली. भारताकडून अर्जुन राजपूतने 107 रन्स केले तर पाकिस्तानचा विकेटकीपर फलंदाज हमजा जहूरने नाबाद 100 रन्सची खेळी केली. जहूरच्या या खेळीमुळे पाकिस्तानने 49 व्या ओव्हरमध्ये 3 विकेट राखून सामना जिंकला.

भारतीय फलंदाजांची निराशाजनक कामगिरी

या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी केली. पण टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार लक्ष्य रायचंदानी दुसऱ्याच बॉलवर शून्यावर बाद झाला. त्यानंतर आर्यवीर सेहवागने 22 रन्स केले. पण त्यालाही मोठी खेळी करता आली नाही. अन्वय द्रविडही 10 रन्स करून माघारी परतला.

India vs Pakistan
Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवचं पुन्हा नशीब चमकलं! मिळाली टी-२० टीमची कॅप्टन्सी, आता दोन ट्रॉफी जिंकण्याचं लक्ष्य

भारतीय फलंदाज एकामागोमाग एक बाद होत गेले. त्यामुळे अवघ्या 86 रन्सवर भारताने 5 विकेट गमावल्या होते. अशा कठीण परिस्थितीत अर्जुन राजपूतने टीमची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. डाव्या हाताच्या अर्जुनने आक्रमक फलंदाजी करत पाकिस्तानच्या गोलंदाजांचा सामना केला.

अर्जुनने शानदार सेंच्युरी मारत भारताला सावरण्याचा प्रयत्न केला. त्याने 85 चेंडूंत 107 रन्स केले. या खेळीत त्याने 11 चौकार आणि 5 षटकार मारले. त्याच्या खेळीमुळे भारताला मोठा स्कोर करण्याची संधी होती. पण 36 व्या ओव्हरमध्ये अर्जुन बाद झाला आणि भारताच्या अडचणी पुन्हा वाढल्या. अखेर टीमध्या 46.3 षटकांत 208 रन्सवर ऑलआऊट झाली.

हमजा जहूरच्या शतकामुळे पाकिस्तानचा विजय

भारताप्रमाणेच पाकिस्तानची सुरुवातही खराब झाली. अवघ्या 61 रन्समध्ये पाकिस्तानने 5 विकेट गमावल्या होत्या. भारताचा फिरकी गोलंदाज मनल चौहान याने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने अवघ्या 2 षटकांत 2 विकेट घेत पाकिस्तानला अडचणीत आणलं.

India vs Pakistan
IND vs NZ 2nd ODI: पावसाचा खेळ, न्यूझीलंडचा गेम; अटीतटीच्या सामन्यात हरता हरता जिंकली टीम इंडिया

यानंतर हमजा जहूरने पाकिस्तानचा डाव सांभाळला. त्याने हसनैन अब्बाससोबत मिळून 107 रन्सची महत्त्वाची पार्टनरशिप केली. या भागीदारीमुळे पाकिस्तानच्या विजयाच्या आशा पुन्हा वाढल्या.

भारताने त्यानंतर आणखी 2 विकेट्स घेत पाकिस्तानच्या अडचणी वाढवल्या . पाकिस्तानला विजयासाठी 26 रन्सची गरज होती आणि त्यांच्या हातात फक्त 3 विकेट्स शिल्लक होत्या. पण हमजा जहूर मैदानावर टिकून होता. त्याने संयमाने फलंदाजी करत पाकिस्तानला विजयाच्या जवळ नेलं.

India vs Pakistan
मोठी बातमी! हार्दिक पांड्या आणि 'सरदार'ची अदलाबदल पक्की; एकाच झटक्यात बदलले समीकरण

अखेर 49 व्या ओव्हरमधील पहिल्याच चेंडूवर त्याने चौकार मारला. याच चौकारासह त्याने आपले शतक पूर्ण केलं आणि पाकिस्तानच्या विजयावरही शिक्कामोर्तब केलं. अशा प्रकारे हमजा जहूरच्या नाबाद शतकामुळे पाकिस्तानने भारतावर 3 विकेट्स राखून विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.