ODI World Cup 2023: विंडीजविरूद्ध दमदार कामगिरी करत ‘या’ युवा भारतीय खेळाडूंनी ठोकली वनडे वर्ल्डकपसाठी दावेदारी;पाहा यादी

IND vs WI 3rd ODI: या मालिकेसाठी भारतीय संघात काही युवा खेळाडूंना संधी दिली गेली होती.
mukesh kumar
mukesh kumarsaam tv
Published On: 

ICC ODI World Cup 2023: नुकताच भारत आणि वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाने दमदार कामगिरी करत २-१ ने विजय मिळवला आहे. मालिकेतील अंतिम सामन्यात भारतीय संघाने २०० धावांनी विजय मिळवला.

या मालिकेसाठी भारतीय संघात काही युवा खेळाडूंना संधी दिली गेली होती. ज्यांनी दमदार कामगिरी करत आगामी वनडे वर्ल्डकपसाठी भारतीय संघात स्थान मिळवण्याचं दार ठोठावलं आहे.

mukesh kumar
IND vs WI 3rd ODI: मैदानाबाहेर राहूनही विराटने जिंकवला सामना; विजयानंतर कॅप्टन पंड्याने केला खुलासा

ईशान किशन :

ईशान किशनने गेल्या ४ इनिंगमध्ये सलग ४ अर्धशतके झळकावली आहेत. त्याने वेस्टइंडीज विरूद्ध झालेल्या दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले होते. त्यानंतर वनडे मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये त्याने अर्धशतक झळकावले आहे.

त्याने पहिल्या वनडेत ५२,दुसऱ्या डावात ५५ तर तिसऱ्या वनडेत त्याने ७७ धावांची खेळी केली आहे. ही दमदार कामगिरी करत त्याने वर्ल्डकपसाठी भारतीय संघाचे दार ठोठावले आहे.

कुलदीप यादव:

वेस्टइंडीज विरूद्धच्या वनडे मालिकेसाठी कुलदीप यादवला देखील भारतीय संघात स्थान देण्यात आले होते. त्याने या मालिकेतील ३ सामन्यांमध्ये ७ गडी बाद केले आहेत. मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने अवघ्या ६ धावा खर्च करत ४ गडी बाद केले होते.

यंदाचा वर्ल्डकप भारतात होणार आहे. त्यामुळे भारतीय संघाला अनुभवी फिरकी गोलंदाजाची गरज पडेल. ही जागा भरून काढण्यासाठी कुलदीप यादव प्रबळ दावेदार आहे. (Latest sports updates)

mukesh kumar
IND vs WI 3rd ODI: मालिका जिंकली, मालिकावीराचा पुरस्कारही पटकावला, तरीही ईशान किशन नाराज; सामन्यानंतर सांगितलं कारण

मुकेश कुमार:

देशातंर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या मुकेश कुमारला देखील भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. या संधीचं सोनं करत भारतीय संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं आहे. पदार्पणाच्या सामन्यात त्याने २२ धावा खर्च करत १ गडी बाद करत केला होता.

तर दुसऱ्या सामन्यात त्याला एकही गडी बाद करता आला नव्हता. तिसऱ्या वनडेत त्याने कमबॅक करत ३ गडी बाद केले. त्याला येणाऱ्या सामन्यांमध्ये जर संधी मिळाली तर तो आणखी चांगली कामगिरी करू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com