Hardik Pandya Statement: दमदार कमबॅक कसं करायचं हे भारतीय संघाला चांगलंच ठाऊक आहे. दुसऱ्या सामन्यात दारुण पराभवाला सामोरं गेलेल्या भारतीय संघाने तिसऱ्या वनडेत दमदार कमबॅक केलं आहे.
मालिकेतील अंतिम सामना जिंकून भारतीय संघाने ३ वनडे सामन्यांची मालिका २-१ ने खिशात घातली आहे.
वेस्टइंडीजचा २०० धावांनी धुव्वा उडवल्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्या खेळाडूंचं कौतुक करताना दिसून आला आहे. सामन्यानंतर काय म्हणाला? जाणून घ्या.
या विजयानंतर बोलताना हार्दिक पंड्या म्हणाला की, ' हा विजय खूप खास आहे. मनापासून सांगायचं झालं तर मला कर्णधार म्हणून असे आणखी काही सामने खेळायला आवडेल. हा सामना कुठल्याही आंतरराष्ट्रीय सामन्यापेक्षा महत्वाचा होता. आम्ही पराभूत झालो असतो तर खेळाडू निराश झाले असते. खेळाडूंना खूप चांगला खेळ केला आणि सामन्याचा आनंद घेतला. दबावाच्या स्थितीत असच असायला हवं.'
तसेच विराट कोहली, रोहित शर्मा आणि शुबमन गिलबद्दल बोलताना तो म्हणाला की, ' विराट आणि रोहित संघातील प्रमुख खेळाडू आहेत. त्यांना विश्रांती देणं गरजेचं होतं. त्यामुळे ऋतुराज गायकवाडला खेळण्याची संधी मिळाली आहे. युवा खेळाडूंना संधी मिळणं गरजेचं आहे. सामना सुरू होण्यापूर्वी विराट सोबत चर्चा केली होती. त्याने मला म्हटलं की, वनडे फॉरमॅटमध्ये मैदानावर अधिक काळ टिकून खेळणं महत्वाचं आहे. तसेच या सामन्यात शुभमन गिलने उत्तम झेल टिपले. (Latest sports updates)
या सामन्यात वेस्टइंडीज संघाने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ३५१ धावांचा डोंगर उभारला होता. भारतीय संघाकडून शुबमन गिलने सर्वाधिक ८५ धावांची खेळी केली.
तर ईशान किशनने ७७ धावा केल्या. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ३५१ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना वेस्टइंडीज संघाचा डाव अवघ्या १५१ धावांवर संपुष्ठात आला. भारतीय संघाने या मालिकेत २-१ ने विजय मिळवला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.